Join us  

Bigg Boss Marathi: अभिजीत सावंतसाठी बहिणी मैदानात, म्हणाल्या- "इंडियन आयडॉलच्या वेळीही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 12:14 PM

अभिजीतला त्याच्या चाहत्यांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. आता त्याला सपोर्ट करण्यासाठी अभिजीतच्या बहिणी मैदानात उतरल्या आहेत. 

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. या शेवटच्या आठवड्यातही घरातील सदस्य खेळात टिकून राहण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. इंडियन आयडॉल १ चा विजेता असलेल्या अभिजीत सावंतलाबिग बॉस मराठीच्या घरात पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. अभिजीतने बिग बॉसच्या घरात त्याच्या उत्तम खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अभिजीतला त्याच्या चाहत्यांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. आता त्याला सपोर्ट करण्यासाठी अभिजीतच्या बहिणी मैदानात उतरल्या आहेत. 

अभिजीतच्या बहिणींनी त्याला सपोर्ट करण्याचं आणि वोट करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. त्या म्हणतात, "बिग बॉस मराठीमध्ये तुम्ही सगळेच जण माझ्या दादाला खूप प्रेम देत आहात. आणि त्याचा प्रवासही तुम्ही जवळून बघितला आहे. अभिजीत जसा एक उत्तम गायक आहे. तसाच तो एक माणूस म्हणूनही चांगला आहे. पण, एक बहीण म्हणून जो प्रवास आम्ही बघितला आहे. तो इंडियन आयडॉलच्या वेळेसही तसाच होता आणि आताही तसाच आहे. तो अजिबातच बदललेला नाहीये. एका टास्कमध्ये त्याला इजा झालेली तुम्ही पाहिली असेल. पण, तरीही तो हेच म्हणाला की माझं घर उपाशी आहे मी स्वस्त बसणार नाही. एक माणूस म्हणूनही तो तसाच आहे". 

"दादा ज्या पद्धतीने तो खेळत आहे. घरातल्या सगळ्या गोष्टी तो सांभाळत आहे. घरातील छोटे-मोठे वाद यामध्ये तो नेहमी मध्यस्थी म्हणून असतो. आणि तो घरातही तसाच आहे. आमच्या कुटुंबातील कोणत्या कार्यक्रमाची जान म्हणजे अभिजीत...त्याच्या गाण्याने आमची पार्टी सुरू होते आणि त्याच्या ह्युमरने पार्टीचा शेवट होतो. मी आत्तापर्यंत त्याला फॉलो करत आले आहे. कारण, आमच्या घरातील तो एक आदर्श मुलगा आहे. आणि ही सेम इमेज त्याने बिग बॉस मराठीच्या घरातही टिकवून ठेवली आहे. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही आमचे मत दिलं आहे. तुम्ही पण द्या", असंही त्या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. 

६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. निक्कीने फिनालेचं तिकीट मिळवून ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर वर्षाताई, अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, आणि धनंजय यांच्यावर नॉमिनेशनची तलवार आहे. या आठवड्यातही एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. यंदाची ट्रॉफी अभिजीतने जिंकावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत सावंतटिव्ही कलाकार