Join us  

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'मध्ये न पाहिलेला अभिजीत सावंत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 6:32 PM

Abhijeet Sawant : मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या अभिजीतचं आयुष्य एका रिएलिटी शोमुळे रातोरात बदलले. आता 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याला लोकांसमोर येण्याची संधी मिळाली आहे.

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) सुरू होऊन १६ दिवस उलटले आहेत. हा कार्यक्रम काही दिवसांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. सर्वच सदस्यांची खेळी 'बिग बॉस' प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. घरातील सदस्यांचं मनोरंजन, टास्क, भावना आणि ट्विस्टने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. तसेच भारताचा पहिला सिंगिंग आयडॉल असणाऱ्या अभिजीत सावंतची खेळी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. 'बिग बॉस मराठी'मध्ये न पाहिलेला अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) दिसणार असल्याचे त्याने स्वत:च सांगितले आहे.

हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक म्हणून अभिजीत सावंत प्रचलित आहे. गाण्यापासून त्याचा प्रवास सुरू झाला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या अभिजीतचं आयुष्य एका रिएलिटी शोमुळे रातोरात बदलले. आता 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याला लोकांसमोर येण्याची संधी मिळाली आहे. घरात जाण्याआधी 'बिग बॉस मराठी'बद्दल बोलताना अभिजीत म्हणाला,"आता गाण्यासह माझं व्यक्तिमत्त्वदेखील प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिजित सावंतबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला बिग बॉसद्वारे कळणार आहेत. माझ्यासोबत ज्यांचं चांगलं जमेल त्यांच्यासोबतच्या गमतीजमती तुम्हाला पाहायला मिळतील".

नेहमीच लोकांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करेल 

अभिजीत सावंत पुढे म्हणालेला,"बिग बॉस मराठी'च्या घरातील सर्व सदस्यांसोबत जमवून घेण्याचा मी प्रयत्न करेल. मी स्वत:ला एक फॅमिली मॅन समजतो. त्यामुळे ज्यावेळेला एका वेगळ्या फॅमिलीमध्ये जाईल त्यावेळेला त्या फॅमिलीलादेखील आपलंसं करण्याचा प्रयत्न करेल. मला हे आवडेल की मी ज्या गोष्टी पद्धतशीरपणे लोकांसमोर मांडू शकेल त्या गोष्टी मी त्याच पद्धतीने मांडेल. ज्यापद्धतीने त्यांना त्या कळतील. त्यामुळे मी नेहमीच लोकांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करेल".

टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉस मराठी