Join us

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस'ने घेतली अभिजीत अन् निक्कीची फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 4:24 PM

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात टास्क, राडे, धमाका होतच असतो. पण त्यासह कधीकधी बिग बॉसदेखील सदस्यांची मजा आणि फिरकी घेताना दिसून येतात.

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi 5) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉसच्या घरात टास्क, राडे, धमाका होतच असतो. पण त्यासह कधीकधी बिग बॉसदेखील सदस्यांची मजा आणि फिरकी घेताना दिसून येतात. आजच्या भागातही 'बिग बॉस' अभिजीत (Abhijeet Sawant) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli)ची फिरकी घेताना दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात 'बिग बॉस' अभिजीतला फ्रीज करताना दिसणार आहेत. त्यामुळे निक्की त्याची मजा घेताना दिसत आहे. त्यानंतर पुढे 'बिग बॉस'देखील निक्कीची फिरकी घेताना दिसत आहेत. अभिजीतला 'बिग बॉस'ने फ्रिज केल्याने तो काहीही खाऊ शकत नाही. त्यामुळे 'बिग बॉस' निक्कीला म्हणत आहेत,"तू भरवू शकतेस". त्यावर निक्की नकार देते. निक्की म्हणते,"अख्खा सीझनभर सर्वांनी त्याला भरवलंच आहे". निक्की भरवत नसल्याने बिग बॉसने अभिजीतला रिलीज केले.

वर्षा ताई करणार डीपी दादांचं कौतुक

दुसरीकडे 'बिग बॉस' धनंजयला म्हणत आहेत,"धनंजय काय बनवताय?". त्यावर धनंजय डाळ बनवत असल्याचं बिग बॉसला सांगतो. बिग बॉस पुढे म्हणतात,"आपली डाळ या घरात शिजते का?". वर्षा ताईंना बिग बॉस विचारतात,"धनंजयने जेवण बनवलं आहे.. काय विचार आहे". त्यावर उत्तर देत वर्षा ताई म्हणतात,"त्याचं सर्व तडकावालं असतं. त्यामुळे सगळ्याबाबतीत त्याला तडका लागतो". त्यावर 'बिग बॉस' विचारतात,"या तडक्यामुळे भडका उडेल का?". पुढे वर्षा ताई डीपी दादांचं कौतुक करताना दिसून येतात. 

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत सावंत