Join us  

'बिग बॉस'ने जान्हवीला म्हटलं टास्क विनर, अभिनेत्री भावुक, म्हणाली- "मी जेलमध्ये होते तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 1:49 PM

ग्रँड फिनालेच्या आधी घरातील सदस्यांना बिग बॉसकडून एक खास सरप्राइज देण्यात आलं. घरातील प्रवास पाहून जान्हवी किल्लेकरचेही डोळे पाणावले.

Bigg Boss Marathi Season 5 :'बिग बॉस मराठी ५' हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. या आठवड्यात बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार आहे. ग्रँड फिनालेच्या आधी घरातील सदस्यांना बिग बॉसकडून एक खास सरप्राइज देण्यात आलं. सदस्यांच्या घरातील प्रवासाचा स्पर्धकांना फ्लॅशबॅक दाखवण्यात आला. यावेळी सदस्य भावुक झालेले पाहायला मिळालं. घरातील प्रवास पाहून जान्हवी किल्लेकरचेही डोळे पाणावले. 

बिग बॉसच्या घरातील प्रवास पाहिल्यानंतर जान्हवी भावुक झाली. तिने गार्डन एरियामध्ये बसलेल्या अभिजीतला येऊन तिच्या भावना व्यक्त केल्या. जान्हवी म्हणाली, "मी जेलमध्ये असताना तुम्ही म्हणाला होतात...ती उठणार, ती लढणार, ती बाहेर येणार यातून हे मला खूप आवडलं". त्यानंतर निक्की तिला विचारते की "आपलं काय दाखवलं?". त्यावर जान्हवी तिला म्हणते, "आपलं फ्रेंडशिपचं खूप छान छान लावलं. नंतर भांडणांचं लावलं होतं. आणि जान्हवी म्हणजे टास्कक्वीन अशी हेडलाईन होती. आपण जिंकलो आहोत. आपल्याला सगळं मिळालं. आपली जर्नी अशा पद्धतीने दाखवली गेली आहे".

दरम्यान, या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. निक्कीने फिनालेचं तिकीट मिळवून ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर वर्षाताई, अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, आणि धनंजय यांच्यावर नॉमिनेशनची तलवार आहे. या आठवड्यातही एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. आता 'बिग बॉस मराठी ५'च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार