Join us  

नक्कीच ही सेटिंग आहे! बिग बॉस मराठीवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणते- "रितेश काही बोलला नाही तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 12:08 PM

Bigg Boss Marathi Season 5 : गेल्या आठवड्यात रितेशने भाऊच्या धक्क्यावर निक्कीचं कौतुक केल्यानंतर या आठवड्यात तिने संपूर्ण घर डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वाधिक चर्चेतील सदस्यांपैकी एक आहे. पण, निक्की कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. घरातही ती मनमानी करत असल्याचं दिसत आहे. वर्षाताई घराच्या कॅप्टन असल्यामुळे निक्कीने घरातील कोणतंही काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे घरातील सदस्यांचीही चिडचिड होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात रितेशने भाऊच्या धक्क्यावर निक्कीचं कौतुक केल्यानंतर या आठवड्यात तिने संपूर्ण घर डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. 

मराठी अभिनेत्री प्रणित हट्टे हिने निक्की आणि बिग बॉसवर संताप व्यक्त करत एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने निक्की आणि बिग बॉसची सेटिंग असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. निक्की घरात मनाला येईल तसं वागत असून वेळोवेळी ती अनेक नियमही ब्रेक करते. पण, बिग बॉस तिला यावरुन काहीच बोलत नाही. याशिवाय निक्कीला कोणतीही शिक्षा बिग बॉसने दिलेली नाही. त्यामुळे अभिनेत्रीने संतप्त पोस्ट लिहिली आहे. 

"बिग बॉसला नेमकं काय झालंय? निक्कीला एवढा पाठिंबा कसा काय मिळतो? निक्कीने बिग बॉसला विकत घेतलंय की बिग बॉसने निक्कीला? जो माज तिला आहे आणि यावर रितेश सर काही बोलले नाही तर नक्कीच ही सेटिंग आहे", असं अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, धनंजय पोवार यांना नॉमिनेट केलं आहे. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार