Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आधी सदस्यांना घरातील साम्रगी आणि बेड, टॉयलेट या गोष्टी विकत घेण्यासाठी BB करन्सी वापरावी लागत होती. यासाठी त्यांना टास्क खेळून ती करन्सी मिळवायची होती. पण, या आठवड्यात मात्र बिग बॉसने सदस्यांना रेशन आणि बेडची सुविधा फुकटमध्ये दिली आहे. मात्र सदस्यांना या आठवड्यात घरातील गॅस विकत घ्यावा लागणार आहे. यासाठी एक मजेशीर टास्क सदस्यांना देण्यात आला आहे.
बिग बॉसच्या घरात यंदाच्या आठवड्यात जंगलराज असणार आहे. त्यामुळे सदस्यांना प्राणी ओळखायचा टास्क देण्यात आला आहे. यामध्ये सदस्यांच्या जोड्या बनवण्यात आल्या आहेत. एकाने अभिनय करून प्राणी दाखवायचे आहेत. तर दुसऱ्याने हे प्राणी अचूक ओळखून जंगलातून ते प्राणी शोधून आणायचे आहेत. त्यानंतर हे प्राणी दिलेल्या क्रमात योग्य लावायचेदेखील आहेत. लवकरात लवकर टास्क पूर्ण करून बाजूला ठेवलेल्या टाकीतील जास्तीत जास्त पाणी सदस्यांना वाचवायचे आहे. जेवढे पाणी वाचणार तेवढी रक्कम सदस्यांना मिळणार आहे. त्यातून त्यांना गॅस खरेदी करता येणार आहे.
हा टास्क खेळताना प्राणी ओळखताना सदस्यांमध्ये दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या भागात अरबाजची धांदल उडाली होती. तर आजच्या भागात सूरजचा गोंधळ उडणार आहे. अंकिता सूरजला पाणगेंडाचा अभिनय करून दाखवत आहे. पण, त्याला मात्र ते ओळखताच येत नाहीये. याचा मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. सूरज आणि अंकिताला पाहून घरातील सदस्यांमध्येही हशा पिकला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात वैभव चव्हाणचा घरातील प्रवास संपला. तर निक्कीच्या कानाखाली मारल्याने आर्याला घरातून एक्झिट घ्यावी लागली. या आठवड्यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत. आता यातील कोणाचा प्रवास संपतो, हे पाहावं लागेल.