Join us  

अभिजीतबरोबर निक्कीला पाहून अरबाज भडकला; भांडी फोडली, सामानाची तोडफोड अन्...; 'बिग बॉस'च्या घरात मोठा राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 9:02 AM

Bigg Boss Marathi Season 5: निक्कीवरुन 'बिग बॉस'च्या घरात अरबाजचा राडा, भांडी फोडली, सामानाची तोडफोड अन्...

Bigg Boss Marathi Season 5 : पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलमध्ये घट्ट मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काही कारणांवरुन त्यांच्यात छोटे मोठे खटके उडत होते. पण, भाऊच्या धक्क्यावर निक्कीसमोर टीम A ची पोलखोल झाल्यानंतर निक्की आणि अरबाजच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता बिग बॉसने नव्या टास्कमध्ये घरातील सदस्यांना जोड्यांमध्ये अडकवलं आहे. यामध्ये निक्की आणि अभिजीतची जोडी बिग बॉसने बनवली आहे. 

तर अरबाजबरोबर बिग बॉसने आर्याला अडकवलं आहे. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना दुसऱ्या जोडीदाराबरोबरच घरातील काम करायची आहेत. सदस्यांना जोडीदाराला सोडून एकटं फिरण्यास मनाई आहे. सुरुवातीपासूनच अरबाजला निक्की आणि अभिजीतची मैत्री पटत नव्हती. निक्कीने अभिजीतशी बोललेलंही अरबाजला आवडत नव्हतं. आता बिग बॉसने निक्की आणि अभिजीतला एकत्र जोडीत अडकवल्यानंतर अरबाजचा राग अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की आणि अभिजीतमधली मैत्री अरबाजला खटकत आहे. यामुळे अरबाजने बिग बॉसच्या घरात राडा घातल्याचं पाहायला मिळत आहे. 

बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये निक्की आणि अभिजीत किचनमध्ये काम करताना दिसत आहेत. निक्की आणि अभिजीतला एकत्र पाहून अरबाजचा राग अनावर झाल्याचं दिसत आहे. ते पाहून अरबाज घरातील भांडी फोडत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर निक्की त्याला "काय बालिशपणा आहे हा" असं म्हणते. तर अरबाज निक्कीला म्हणतो, "तू मला खूप हर्ट करतेय". त्यावर निक्की त्याला "तुला माझी गरज नाही" असं म्हणते. ते ऐकून अरबाजचा भडकतो आणि हॉलमधील सामानाची तोडफोड करत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, पुरषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले यांच्यानंतर गेल्या आठवड्यात इरिना रुडाकोव्हा हिचा घरातील प्रवास संपला. आता यंदाच्या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण होणार? आणि कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार, हे पाहावं लागेल. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार