Join us  

Bigg Boss Marathi 5: अरबाजने निक्कीसाठी काढला हार्ट, दोघांचं होणार का पॅचअप?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 9:24 AM

Bigg Boss Marathi Season 5 : सध्या घरात टीम ए च्या सदस्यांमध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे. याबरोबरच निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते.

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन(Bigg Boss Marathi Season 5)ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. हा शो विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. सध्या घरात टीम ए च्या सदस्यांमध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे. याबरोबरच निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाज (Arbaz Patel) यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. दोघांमध्ये मोठी भांडणे झालेली मागील काही भागात पाहायला मिळाले होते. पण कालच्या भागात मात्र दोघांनी एकमेकांसोबत बोलून त्यांच्यातील वाद मिटवल्याचे पाहायला मिळाले.

'बिग बॉस मराठी'चा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत अरबाजने काचेवर आय मिस यू लिहिताना दिसतो आहे. त्यानंतर तो हार्टदेखील काढतो. निक्कीपासून दुरावणे अरबाजला सहन होत नसल्याचे प्रोमोवरून स्पष्ट होत आहे. तर अरबाजला आर्याचा मात्र चांगलाच पाठिंबा मिळत आहे. या प्रोमोत आर्या अरबाजला विचारते की, मिस यू का लिहिलंस? तर दुसरीकडे निक्की आणि अभिजीत एकत्र बसलेले दिसत आहे. तेव्हा अभिजीत निक्कीला सांगतो की अरबाजने हार्ट काढलेलं पाहिलेस का. नंतर निकी जाऊन पाहते आणि अरबाजला विचारते हे काय केलं आहेस तू. त्या हार्टवर दोन चेहरे काढले आहेत. त्यातील एक मी असल्याचे निक्की म्हणते. तर दुसरा मी आहे, असे अभिजीत सांगतो. त्यावर निक्की म्हणजे, मग डरपोक अरबाज कुठे आहे. तर आर्या अरबाजला सांगताना दिसते की, तुला तिच्यापासून दूरदेखील राहिले पाहिजे. 

आता निक्की आणि अरबाज यांचे नाते पूर्वीसारखे होईल का, पुढच्या खेळात ते एकमेकांबरोबर कसे राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच टीम ए मधील जान्हवी आणि वैभव यांना हे मान्य असेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठी