Join us  

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात आर्या, निक्की अन् जान्हवीचा कल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 5:06 PM

Bigg Boss Marathi 5: आजच्या भागात 'बिग बॉस मराठी'च्या घरात आर्या, निक्की आणि जान्हवीमध्ये वाद होताना दिसणार आहे.

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi 5) सातत्याने चर्चेत येतो आहे. या सीझनमधील सर्वच स्पर्धक प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. आजच्या भागात 'बिग बॉस मराठी'च्या घरात आर्या, निक्की आणि जान्हवीमध्ये वाद होताना दिसणार आहे.. आता या तिघींना कोण शांत करणार हे पाहावे लागेल. 

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी म्हणत आहे,"बिग बॉस' मी स्वत:ला सांभाळू शकत नाही". पुढे आर्याला निक्की म्हणते,"माझ्या पांघरुनला हात लावायचा नाही". आर्या म्हणते,"दम असेल तर मला फोडून दाखव". तिघींमध्ये नेमके काय झालंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा भाग पाहावा लागेल.  

निक्की बदलली असल्याचा अरबाजला संशय'बिग बॉस मराठी'च्या घराची निक्की तांबोळी आता कॅप्टन झाली आहे. कॅप्टन झाल्यानंतर निक्की बदलली असल्याचा अरबाजला आणि जान्हवीला वाटत आहे. याबद्दल आजच्या भागात अरबाज, निक्की आणि घन:श्याममध्ये आजच्या भागात चर्चा होणार आहे. 

'बिग बॉस' खतरनाक आहेत : अरबाज पटेल'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अरबाज पटेल म्हणत आहे,"बिग बॉस' खतरनाक आहेत. माझ्या कॅप्टनसीमध्ये डिलेमा दिलाय त्यांनी. कॅप्टनसी बरोबर सुरू होती. इम्युनिटी हा सर्वात मोठा प्रश्न होता. या इंडस्ट्रीत मी नवीन आहे". त्यावर अंकिता म्हणते,"मला प्रामाणिकपणे तुझा खेळ वीक वाटत नाही. मला वैभवचा खेळ वीक वाटतो". 

टॅग्स :बिग बॉस मराठी