Join us

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसमध्ये आला नगरचा  छोटा 'पुढारी'! म्हणाला, "नेतेगिरी सुटणार नाही, गुवाहाटीला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 10:21 PM

Bigg Boss Marathi 5: भल्याभल्यांची पोल खोलणार म्हणत छोट्या पुढारीचा बिग बॉसमध्ये प्रवेश

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी 5 चा प्रीमियर कलर्स मराठीवर दणक्यात सुरु आहे. रितेश देशमुखने त्याच्या स्टाईलने कल्ला सुरु केला आहे. यंदा बिग बॉसमध्ये नगरच्या छोट्या पुढारीने एन्ट्री घेतली आहे. घनश्याम दराडे असं या छोट्या पुढाऱ्याचं नाव आहे ज्याने आपल्या भाषणातून अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता तो बिग बॉसच्या घरात जाऊन कोणतं राजकारण करतो हे पाहणं महत्वाचं आहे.

रितेश देशमुखने सुरुवातीला स्टेजवर येताच घनश्याम दराडेचं स्वागत केलं. यावेळी घनश्यामने आधी स्वर्गीय विलासराव देशमुख यांची आठवण काढली. बिग बॉसमध्ये प्रवेश करण्याविषयी तो म्हणाला, " या घरात आघाडी होईल किंवा युती पण नेतेगिरी सुटणार नाही. बाकीच्यांनी पाठिंबा दिला तर सोबत चालू. पण सत्ता आणण्याचं काम आपण करु. गुवाहाटीला जाण्याची गरज पडणार नाही", असं म्हणत त्याने राजकीय फटकेबाजी केली आहे.

घनश्याम दराडेने घरातील सदस्यांचा विचार करुन bb करन्सी म्हणजेच १० हजारांचा स्वीकार केला. पॉवर कार्ड सोडून त्याने इतरांसाठी ही करन्सी घेतली. आतापर्यंत वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर आणि निखिल दामलेने एन्ट्री घेतली आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखअहमदनगरराजकारणकलर्स मराठी