Join us  

Bigg Boss Marathi 5: "माझ्यामुळे ३५ वर्ष सत्तेत असलेला आमदार पडला", 'बिग बॉस'च्या घरात छोटा पुढारीचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 3:30 PM

Bigg Boss Marathi 5 Contestant: भाषणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा पुढारी 'बिग बॉस'च्या घरातही त्याचं स्थान निर्माण करत आहे. पण, 'बिग बॉस मराठी'च्या घरात येताच या छोटा पुढारीने मोठा दावा केला आहे. 

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन नुकताच सुरू झाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक सरप्रायजेस चाहत्यांना मिळाले आहेत. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये छोटा पुढारी घनश्याम दरवडेला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. भाषणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा पुढारी 'बिग बॉस'च्या घरातही त्याचं स्थान निर्माण करत आहे. पण, 'बिग बॉस मराठी'च्या घरात येताच या छोटा पुढारीने मोठा दावा केला आहे. 

पहिल्याच दिवशी 'बिग बॉस'च्या घरात छोटा पुढारीने त्याच्यामुळे एक मोठा आमदार पडल्याचा दावा केला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्यांशी बोलताना त्याने असं सांगितलं. ३५ वर्ष सत्तेत असलेला आमदार माझ्या एका भाषणामुळे पडला, असं घनश्याम म्हणाला आहे. 

नेमकं काय म्हणाला छोटा पुढारी? 

घनश्याम दरवडे म्हणाला, "मी जनतेचा पुढारी आहे. माझ्यामुळे एक आमच्याच तालुक्यातला एक आमदार पडला. माझं भाषण झालं, लोकांना ते भाषण इतकं भावलं की मीडियाने पण नंतर ते उचलून धरलं. ३५ वर्षे सत्तेत असलेल्या आमदाराला चिमुकल्यानं पाडलं, असं म्हटलं गेलं". त्यावर वर्षा उसगावकर त्याला विचारतात की "त्यामुळे काय झालं?" यावर तो उत्तर देत म्हणतो, "त्यामुळे गावात रस्ता आला, पाणी आलं". 

'बिग बॉस मराठी'च्या घरातले स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार