Join us  

निक्कीचे हाय हिल्स घालून छोटा पुढारीचा रॅम्पवॉक, अंकिता-अभिजीतने उडवली खिल्ली, तर नेटकरी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:59 AM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : गेल्याच आठवड्यात घनश्याम निक्कीचं ब्लँकेट घडी करताना दिसला होता. त्यावरुन अंकिता आणि घरातील इतर सदस्यांमध्ये चर्चा रंगली होती. आता छोटा पुढारीने थेट निक्कीचे हाय हिल्स घालून घरात रॅम्पवॉक केला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या या नव्या सीझनमध्ये दिवसागणिक घरातील सदस्यांची समीकरणं बदलत असल्याचं दिसत आहे. पहिल्या दिवासापासूनच निक्की तांबोळी घरातील सर्वाधिक चर्चेतील सदस्यांपैकी आहे. तर छोटा पुढारीनेही त्याचा गेम दाखवायला सुरुवात केली आहे. निक्कीच्या टीममध्ये असलेल्या घनश्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. 

अनेकदा घरात घनश्याम निक्कीबरोबरच बोलताना दिसतो. गेल्याच आठवड्यात घनश्याम निक्कीचं ब्लँकेट घडी करताना दिसला होता. त्यावरुन अंकिता आणि घरातील इतर सदस्यांमध्ये चर्चा रंगली होती. आता छोटा पुढारीने थेट निक्कीचे हाय हिल्स घालून घरात रॅम्पवॉक केला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत घनश्याम निक्कीची सँडल घालताना दिसत आहे. पुढे निक्की त्याला रॅम्पवॉक कसा करायचा हेदेखील शिकवत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

घनश्यामने निक्कीची सँडल घातल्याचं पाहून अंकिता म्हणते, "निक्कीची चप्पल घालतोय, हिल्स घालतोय. याला म्हणतात पुढारी". त्यावर योगिता तिला "काय प्रगती आहे त्याची", असं म्हणते. घरातील इतर सदस्य अभिजीत, पॅडी त्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातील छोटा पुढारीचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही घनश्यामला ट्रोल केलं आहे. 

"या छोट्याला बघून एक तीव्र सनक डोक्यात जाते", "निक्की एखाद्या बाहुल्या सारखं खेलावतिये याला...थोडी तरी लाज ठेव बाबा...", अशा संतप्त कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. "गुदगुल्या केल्या म्हणून dp ला nominate केलेलं याने.. काय तर म्हणे लोक काय म्हणतील की महाराष्ट्राचा पुढारी गुदगुल्या करतो..आणि आता तेच लोक काय म्हणत असतील याचा विचार कर रे", असंही एकाने म्हटलं आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार