Join us  

Bigg Boss Marathi 5 : बाईsss वरुन आईsss! घरात आले नवे पाहुणे, बिग बॉसने निक्कीची घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:41 AM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरातील सदस्यांना सरप्राइज मिळालं आहे. घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांनाही रोज नवे सरप्रायजेस मिळत आहेत. या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने घरात एका नवीन पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं सांगितलं होतं. आता तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरातील सदस्यांना सरप्राइज मिळालं आहे. घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 

कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडियावरुन एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरातील या नवीन पाहुण्यांची झलक दाखविण्यात आली आहे. दोन बाहुले घरात आल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्या बाहुल्यांना जान्हवी आणि निक्कीने हातात घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर निक्की घनश्यामला "तू मामा आहे ना" असं म्हणत असल्याचं दिसत आहे. निक्की बाळ घेऊन घरात फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर बिग बॉस तिची फिरकी घेत म्हणतात, "निक्की बाईsss वरुन आईsss!". बिग बॉसच्या या वक्तव्यानंतर घरातील सगळेच हसत असल्याचं दिसत आहे. 

बिग बॉसच्या घरात आलेल्या या चिमुकल्यांमुळे घरातील सगळेच सदस्य खूश असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम राहणार? की घरातील हे चिमुकले पाहुणे त्यांची डोकेदुखी बनणार हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. या चिमुकल्या पाहुण्यांबरोबर बिग बॉस आणखी नवी काय ट्विस्ट आणणार आहे, हेदेखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

दरम्यान, पहिल्या आठवड्यात किर्तनकार पुरषोत्तम दादा पाटील यांनी घरातून एक्झिट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात निक्की तांबोळी, योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. पण, बिग बॉसने ट्विस्ट आणत कोणालाच घराबाहेर काढलं नाही. आता या आठवड्यात नवीन कॅप्टन आणि नॉमिनेशनचा टास्क रंगलेला पाहायला मिळेल. आता या टास्कमध्ये या चिमुकल्यांचा काही संबंध आहे का, हे पाहावं लागेल.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार