Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये परदेसी गर्ल इरिना रुडाकोवा सहभागी झाली आहे. परदेशी असली तरी इरिनाने तिचं मन मात्र मराठी असल्याचं दाखवून दिलं आहे. मराठमोळ्या स्टाइलने ती प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. बिग बॉसच्या घरात मराठी बोलण्यापासून, एकादशीचा उपवास ते महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टींमुळे इरिना चर्चेत आहे. आता इरिनाने बिग बॉसच्या घरात थेट लावणीवर डान्स केला आहे.
यंदाच्या सीझनमधील पहिला भाऊचा धक्का वीकेंडला पाहायला मिळाला. शनिवारी रितेशने घरातील प्रत्येक स्पर्धकाची शाळा घेतली. तर आता रविवारी भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना थोडं खेळीमेळीचं वातावरण दिसणार आहे. याचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत धनंजय पवारबरोबर इरिना लावणीवर डान्स करताना दिसत आहे. "मला भूताने पछाडलं", या गाण्यावर इरिना आणि DP डान्स करताना दिसत आहे. DP त्याच्या कोल्हापूरी स्टाइलने इरिनाला लावणी डान्स शिकवत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार हे सदस्य नॉमिनेट झाले होते. आता यांच्यापैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार हे आज कळेल.
'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण