Join us

"अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण...", पती कुणाल भगतसाठी 'कोकण हार्टेड गर्ल'ची रोमॅन्टिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:05 IST

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अंकिता वालावलकर (Ankita सातत्याने चर्चेत येत असते.

Ankita Walawalkar: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सातत्याने चर्चेत येत असते. कोकण हार्टेड गर्ल या नावाने ओळखली जाणारी अंकिता चाहत्यांमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांची लाडकी असणाऱ्या या कोकणकन्येने संगीतकार कुणाल भगतशी  लग्नगाठ बांधली. कोकणातील कुडाळ येथे पारंपरिक पद्धतीने १६ फेब्रुवारीला तिचा विवाहसोहळा पार पडला. तिच्या लग्नाचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच नुकतीच अंकिताने सोशल मीडियावर तिचा पती कुणाल भगतसाठी रोमॅन्टिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने नवरोबाला हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकिता वालावलकर सोशल मीडियावर  खूप सक्रिय असते. या माध्यमातून ती आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबाबत महत्वाच्या अपडेट्स चाहत्यांना देत. सध्या तिने पती कुणालच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने कुणालचं कौतुक करत लिहिलंय की, प्रिय कुणाल,आज तुझा वाढदिवस..., आपण दोघेही सेलिब्रेशनच्या बाबतीत तसे अरसिक आहोत. पण आजचा दिवस तुझ्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्वाचा आहे. आजच्या दिवशी एका घरात एक “मुन्ना” जन्माला आला आणि त्याने २ महिन्यापूर्वी एका वाट चुकलेल्या सैरभैर मुलीला तिच्या आयुष्यात स्थिरता मिळवून दिली. अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण ती का वागते ते तु शोधलंस. 

पुढे अंकिताने लिहिलंय, "तुझ्या असण्याने मला कामाची अजुन ऊर्जा मिळत राहते..का जगाव यापेक्षा आयुष्य किती येक नंबर आहे हे तू दाखवलंस. तुझ्या म्हणण्याप्रमाणे वाढदिवस म्हणजे आपण मागच वर्ष किती भारी जगलो याचं celebration असलं पाहिजे. मागच्या वाढदिवसाला लग्नासाठी नाही म्हणणारी मी ह्या वाढदिवसाला तुझी बायको आहे अजून भारी काय असू शकत!!!!!  मी हे म्हणणार नाही की देव तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करो..मी हे म्हणेन की स्वामी मला एवढी ताकद देवोत की मी तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करेन. तुला जन्मदिवसाच्या झापुक झुपूक शुभेच्छा!!! खूप काम कर,खुप मोठा हो. मी काय स्टुडिओत चटई टाकुन झोपेन. आता रात्री उशीरापर्यंत काम करायचं नाही, बरं का? हॅप्पी बर्थडे डार्लिंग नवऱ्या...", अशी सुंदर पोस्ट लिहित अंकिताने तिच्या नवऱ्याबद्दल प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरटेलिव्हिजनबिग बॉससोशल मीडिया