Join us

नवरात्रोत्सवात 'बहरला हा मधुमास' गाण्यावर 'परदेसी गर्ल'चा भन्नाट डान्स; चाहत्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 12:19 PM

'बिग बॉस मराठी'च्या यंदाचा पर्वात 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवा सहभागी झाली होती.

Irina Rudakova: 'बिग बॉस मराठी'च्या यंदाचा पर्वात 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवा सहभागी झाली होती. इरिना रुडाकोव्हाची ग्लॅमरस अंदाजात 'बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री झाली. मूळची परदेशी असली तरीही ती गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहे. परदेशात जन्म होऊनही इरिनाला भारतीय संस्कृतीचा प्रचंड अभिमान आहे. 'बिग बॉस'च्या घरात सर्वात जास्त मराठी संस्कृती जपणारी मुलगी म्हणून, रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर इरिना रुडाकोवाचं कौतुक केलं होतं. अशातच सोशल मीडियावर 'परदेसी गर्ल'चा नवरात्रोत्सवात डान्स करतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

नवरात्रोत्सवात 'परदेसी गर्ल' इरिनाने या 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. तसेच हावभावसहित इरिना या ट्रेंडिग गाण्यावर ठुमकताना दिसत आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. इरिनाचा व्हायरल होणारा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये सहभागी झालेली इरिना रुडाकोवा ही IPL ची चिअरगर्ल आणि मॉडेल आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात असताना मी एकदशीचे उपवासही करते, असा खुलासा तिने केला होता. तिच्या या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. 

टॅग्स :बिग बॉस मराठीनवरात्रीटिव्ही कलाकारसोशल मीडियासोशल व्हायरल