Abhjeet Sawnt And Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात अभिनेत्री निक्की तांबोळी आणि गायक अभिजीत सावंत यांची स्पर्धक म्हणून जुगलबंदी पाहायला मिळाली होती. अभिजीत आणि निक्की दोघेही शोमध्ये वेगवेगळ्या टीममधून खेळत होते. कधी त्यांच्यात मैत्री तर कधी वाद झाल्याचं दिसलं. त्यांची जोडी प्रेक्षकांनाही आवडली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकाच कार्यक्रमात पाहण्याची संधी मिळणार आहे.
'सेलिब्रिटी मास्टर शेफ' (Celebrity Master Chef ) हा आगळा-वेगळा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या शोमध्ये बरेच सुपरहिट चेहरे स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत आणि आपल्या कुकिंगने ते प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. याच कार्यक्रमात निक्की आणि अभिजितदेखील सहभागी झालेत. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. आता निक्की आणि अभिजित यांना एकाच कार्यक्रमात पाहण्यासाठी त्यांचे चाहते मात्र कमालीचे उत्सुक झाले आहेत.
'सेलिब्रिटी मास्टर शेफ' या शोचं परिक्षण 'मास्टरशेफ इंडिया' फेम रणवीर बरार आणि विकास खन्ना करणार आहेत. तर फराह खान हा शो होस्ट करणार आहे. लवकरच हा शो प्रेक्षकांना सोनी टीव्हीवर पाहता येणार आहे. हा शो कधीपासून आणि किती वाजता प्रसारित केला जाईल, हे लवकरच समोर येईल. यात मास्टरशेफमध्ये निक्की आणि अभिजित शिवाय अभिनेत्री उषा नाडकर्णी, राजीव अडातिया, अर्चना गौतम, आयेशा झुल्का, चंदन प्रभाकर, तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कर, गौरव खन्ना आणि कविता सिंग हे कलाकार सहभागी होणार आहेत.