'बिग बॉस मराठी ५'ची उत्सुकता शिगेला आहे. अवघ्या चार दिवसांत 'बिग बॉस मराठी ५' कलर्स मराठीवर सुरु होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच 'बिग बॉस मराठी ५' च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये लोकमत फिल्मीशी बोलताना रितेश देशमुखने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल त्याचं रोखठोक मत व्यक्त केलंय.
ट्रोलिंगबद्दलरितेश देशमुख काय म्हणाला?
सोशल मीडियावर कलाकारांना वारंवार ट्रोल केलं जातं त्यावर रितेश देशमुख म्हणाला की, "एकतर मी राजकीय घरातून आहे, दुसरं मी एक अभिनेता आहे, म्हणून ट्रोलिंग हे काय नवीन नाही. ट्रोलिंग होणं हे ठीक आहे. त्याला काय गांभीर्याने घ्यायची गरज नाही. कोणीही जर constructive critisicm केलं तर मी ते स्विकारु शकतो. कारण प्रत्येकाचं म्हणणं आहे ते आपण ऐकलं पाहिजे. ट्रोलिंगला जास्त लक्ष द्यायचं गरज नाही."
रितेश करणार 'बिग बॉस मराठी ५'चं होस्टिंग
तंटा नाय तर घंटा नाय... रितेश भाऊचा हा डायलॉग आज महाराष्ट्रातील घराघरांत तोंडपाठ झालाय. रिअॅलिटी शोचा बाप असणाऱ्या 'बिग बॉस मराठी'च्या आतापर्यंतच्या सर्व प्रोमोंना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चारही प्रोमोमध्ये रितेश देशमुखची 'लयभारी बॉसगिरी' पाहायला मिळाली. रितेशचा हाच स्वॅगवाला अंदाज प्रेक्षकांना 'बिग बॉस मराठी ५'मध्ये बघायला मिळेल. २८ जुलै रात्री ९ वाजता 'बिग बॉस मराठी ५'चा ग्रँड प्रिमियर बघायला मिळेल.