Join us

सूरज चव्हाणला भेटण्यासाठी जान्हवी किल्लेकर थेट बारामतीला पोहचली; फोटोंवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 11:02 AM

'किलर गर्ल' जान्हवी किल्लेकरने(Jahnavi killekar) नुकतीच सूरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली.

Suraj Chavan Post : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi)  यंदाचं पर्व चांगलच गाजलं. अलिकडेच या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. बारामतीचा पठ्ठ्या 'गुलिगत धोका' फेम सूरज चव्हाणने (Suraj Chavan)'बिग बॉस मराठी'च्या ट्राफीवर आपलं नाव कोरलं आहे. या कार्यक्रमाने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील स्पर्धक त्यांचं मैत्रीचं नात जपताना दिसत आहे. अलिकडेच 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवा तसेच वैभव चव्हाण याने  कोल्हापुरला जाऊन धनंजय पोवर यांची भेट घेतली. तसेच निक्की-अरबाजच्या भेटीचेही फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. अशातच 'किलर गर्ल' जान्हवी किल्लेकरने(Jahnavi killekar) नुकतीच सूरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली. सूरज चव्हाणने सोशल मीडियावर जान्हवी आणि त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.  

'बिग बॉस'चं घर जान्हवीने दणाणून सोडलं होतं. जान्हवी तिच्या खेळीमुळे कायम चर्चेत असायची. दरम्यान, जान्हवी 'बिग बॉस मराठी'च्या टॉप ६ सदस्यांपैकी एक होती. 'बिग बॉस मराठी'च्या फायनलला पैशांची बॅग उचलत जान्हवीने सहाव्या स्थानावर समाधान मानणं पसंत केलं. तर सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला. अखेरीस हा कार्यक्रमानंतर जान्हवीने सूरज चव्हाणची बारामतीत जाऊन भेट घेतली आहे. "माझी लाडकी ताई" असं कॅप्शन देत सूरजने त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. 

सोशल मीडियावर सूरज-जान्हवीचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सूरजने शेअर केलेल्या .या पोस्टवर एका नेटकऱ्याने 'एक नातं रक्तापलीकडचं' अशी कमेंट केली आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया