Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा चौथा आठवडा सुरू झाला आहे. या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच जान्हवी किल्लेकर तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अनेकदा घरातील सदस्यांशी बोलताना जान्हवीची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. जान्हवीने वर्षा उसगावकर यांच्याशी वाद घालताना अपमानास्पद शब्द वापरले होते. त्यावरुन भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने तिला सुनावलंही होतं. तरीदेखील आता पुन्हा पंढरीनाथ कांबळेशी बोलताना जान्हवीची जीभ घसरली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या टास्कदरम्यान जान्हवीने पॅडी कांबळेचा जोकर म्हणून उल्लेख केला. त्यानंतर तिने पॅडीला त्याच्या कामावरुन आणि अभिनयावरुनदेखील हिणवलं. "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअॅक्टिंग घरात दाखवत आहेत", असं जान्हवी पॅडीला म्हणाली. जान्हवीच्या या वक्तव्यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. अनेक सेलिब्रिटींनीही जान्हवीबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत पॅडीला पाठिंबा दिला होता. आता या संपूर्ण प्रकरणानंतर जान्हवीचा पती किरण किल्लेकर यांनी त्यांची बाजू मांडली आहे. एक पोस्ट शेअर करत त्यांनी जान्हवीला सपोर्ट केला आहे.
जान्हवीचा पती किरण किल्लेकर यांची पोस्ट
जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करियरबद्दल बोलणं योग्य नाही. पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली.
याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे...ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचे घर साधं घर नाही. तिथे आलेले लोक पॉझिटिव असतील असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत असंही नाही... तिथे गेल्यानंतर लोक बदलतात. त्यांची वागण्याची पद्धत बदलते. याचा त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही.
लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर... जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल...मी ह्या बाईचा १ दिवस पाणउतारा करेन. अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडी आहेत, अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू... तेव्हा कुठे गेलेले आदर्श तेव्हा वर्षा ताई सिनियर नव्हत्या म्हणजे ?
जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श, चुकीचे शब्द लोकांना दिसले. पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची ती सेवा करते. ते फक्त फुटेजसाठी असतं, असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा 24 तासांच्या प्रवासात काय काय घडतं. आपल्याला याची माहिती नसते... ती १ तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगलं हे लोकांनी ठरवू नका. बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं? कसं उत्तर देतं आणि का देतं? याचा पण विचार करा...
बस्स...बोलायला खूप आहे पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण, लोक माझ्या या विषयाला आता आगीसारखं पसरवतील आणि काही तरी चुका काढतील. त्या सगळ्यांना मी शुभेछा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो. मी जान्हवी साठी एवढंच म्हणेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळू हळू पुढे जा. आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी.
जान्हवीसाठी किरण यांनी केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमधून त्यांनी जान्हवीला पाठिंबा दिला आहे.