Join us  

जान्हवीसाठी धावून आली जाऊबाई! 'बिग बॉस' आणि रितेशला म्हटलं Unfair, म्हणते- "भाऊच्या धक्क्यावर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 3:31 PM

Bigg Boss Marathi Season 5 :जान्हवीच्या जाऊबाई संध्या किल्लेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी बिग बॉस आणि रितेश देशमुखला unfair म्हटलं आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : जान्हवी किल्लेकरने बिग बॉसच्या घरात पॅडीचा अपमान केल्याने आणि घर डोक्यावर घेतल्याने रितेश देशमुखने तिची भाऊच्या धक्क्यावर खरडपट्टी काढली होती. यामुळे रितेशने जान्हवीला एक आठवडा जेलमध्ये राहण्याची शिक्षाही सुनावली होती. त्याबरोबरच भाऊच्या धक्क्यावरही जान्हवीला नो एन्ट्री असल्याचं रितेशने सांगितलं होतं. त्यानंतर गेल्या आठवड्यातही रितेशने जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर स्थान दिलं नाही. पण, यावरुन मात्र आता जान्हवीच्या जाऊबाईने प्रतिक्रिया दिली आहे. 

जान्हवीच्या जाऊबाई संध्या किल्लेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी बिग बॉस आणि रितेश देशमुखला unfair म्हटलं आहे. 

काय म्हणाल्या जान्हवीच्या जाऊबाई? 

घरातील वस्तूंची आदळाआपट करून Bigg Boss House चे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे...

टास्कमध्ये आक्रमकता दाखवून Physically Violent होण्यालाशिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे...

घरातील एका सदस्यावर शिवीगाळ करून Bip Bip...ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडापण, साठी चर्चाही नाही... पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे...

आणि जान्हवीने केलेल्या चुका तिने मान्य करूनही,घरातील व प्रेक्षकांची मनापासून माफी मागुनहीप्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही...

हे खरंच खूप Unfair आहेजान्हवीसाठी घरातील इतर सदस्यांप्रमाणेतिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे.

"१ आठवडा शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्कयावर स्थान मिळालं नाही.. पण तुझ्या Strong, Fair & Individual Game ने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा जागा मिळव. We Will Always Support You. #जाह्नवी समर्थक", असं संध्या किल्लेकर यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. यापोस्टमध्ये त्यांचा रोख हा अरबाज आणि निक्कीवर दिसत आहे. दरम्यान, यंदाच्या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी यांच्याबरोबरच धनंजय पोवार यांनाही नॉमिनेट केलं. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार