Join us  

'बिग बॉस मराठी'च्या घरात गेले केदार शिंदे, शोमध्ये येणार मोठा ट्विस्ट? 'त्या' व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:27 PM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :बिग बॉस मराठी ५मध्ये काही स्पर्धकांच्या एन्ट्रीनेही चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता बिग बॉसच्या घरात सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे दिसले आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी पाचवा नवा सीझन खऱ्या अर्थाने खास ठरला आहे. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉस मराठीचा होस्टही बदलण्यात आला. महेश मांजरेकरांऐवजी आता अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठीचं होस्टिंग करतो. बिग बॉस मराठी ५मध्ये काही स्पर्धकांच्या एन्ट्रीनेही चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता बिग बॉसच्या घरात सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे दिसले आहेत. 

केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते बिग बॉस मराठीच्या घरातील कन्फेशन रुममध्ये असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी "कोणती जागा आहे ओळखा", असं कॅप्शन दिलं आहे. केदार शिंदेंनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. आता बिग बॉसमध्ये आणखी कोणता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार, याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

"बिग बॉसमध्ये आले रिअल बिग बॉस", "द रिअल बिग बॉस", "शोचे रिअल बिग बॉस...तुम्हाला बघून नक्की आनंद वाटेल", "वाह सर", "सर तुम्ही आमचे बिग बॉस आहात" अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, यंदाच्या आठवड्यात योगिता चव्हाण आणि निखिल दामले यांचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे. या आठवड्यात घराचा कॅप्टन झाल्यामुळे अरबाज पटेल सेफ असेल. त्यामुळे आता कोणत्या सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार असेल, हे पाहावं लागेल.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारकेदार शिंदेमराठी अभिनेता