Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी ५ चा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. या दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील पहिलं कॅप्टन्सी कार्य पार पडलं आहे. या कॅप्टन्सी कार्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घरातील यंदाच्या आठवड्याची कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अंकिता वालावलकरला बिग बॉस मराठी ५चा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे.
बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीसाठी बुलेट ट्रेनचा टास्क खेळवण्यात आला होता. यामध्ये योगिता चव्हाणला घरातील या आठवड्याचा आणि यंदाच्या सीझनमधील घराचा पहिला कॅप्टन घोषित करण्याचा मान मिळाला होता. सुरुवातीपासून प्रत्येक फेरीत काही सदस्या बाद होत गेले. त्यामुळे शेवटी अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, पॅडी कांबळे, वैभव नाईक आणि निक्की तांबोळी हे सदस्य कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीत होते. यापैकी कोण घराचा कॅप्टन होणार, याचा निर्णय योगिताला द्यायचा होता. योगिताने अभिजीत, पॅडी, निक्की आणि वैभवला बाद करत कोकण हार्टेड गर्लला कॅप्टन घोषित केलं.
यंदाच्या आठवड्याची आणि या पर्वाची पहिली कॅप्टन झाल्यानंतर अंकिताला घरातील सदस्यांनी उचलून कॅप्टन रुमपर्यंत नेलं. धनंजय दादाने अंकिताला उचलून घेतलं. तर अभिजीत, वर्षा उसगावकर, निखिल दामले, आर्या जाधव, पॅडी या सदस्यांनी तिच्यासाठी "आ, चल के तुझे मै लेके चलू एक गगन के तले...जहाँ गम भी ना हो, आँसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले" हे गाणंही गायलं. त्यामुळे अंकिता थोडी भावुकही झाली होती.
दरम्यान, घराचा कॅप्टन झाल्यामुळे यंदाच्या आठवड्यात अंकिता नॉमिनेशनपासून सुरक्षित असणार आहे. गेल्या आठवड्यात अंकिताला नॉमिनेशन प्रक्रियेत नॉमिनेट करण्यात आलं होतं. पण, चाहत्यांनी भरघोस वोट करत तिला सेव्ह केलं होतं. पहिल्या आठवड्यात किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला.
'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण