Join us  

'कोकण हार्टेड गर्ल'ची लगीनघाई! अंकिताच्या केळवणाला सुरुवात, होणाऱ्या नवऱ्याने दिलं खास सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 11:01 AM

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात अंकिता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या केळवणालाही सुरुवात झाली असून बिग बॉसच्या घराबाहेर येताच अंकिताला नवऱ्याकडून खास सरप्राइज मिळालं आहे.

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी ५ ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. हे पर्व अनेक कारणांनी खास ठरलं. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक सरप्रायजेस यंदा प्रेक्षकांना मिळाले. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता. अंकिताला बिग बॉसच्या घरात पाहून चाहते आनंदी झाले होते. बिग बॉसच्या घरातील खेळीने अंकिताने चाहत्यांची मनं जिंकून घेतली. 

या पर्वातील टॉप ६ पैकी अंकिता एक होती. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात अंकिता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या केळवणालाही सुरुवात झाली असून बिग बॉसच्या घराबाहेर येताच अंकिताला नवऱ्याकडून खास सरप्राइज मिळालं आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केले आहेत. 

बिग बॉस मराठीचं घर गाजवून आलेल्या अंकिताला होणाऱ्या नवऱ्याकडून खास सरप्राइज मिळालं. अंकितासाठी नवऱ्याने खास फुग्यांची सजावट करत 'Winner' असं लिहिलं होतं. "थँक्यू नवऱ्या" असं म्हणत अंकिताने याची झलक दाखवली आहे. तर दुसरीकडे अंकिताला मैत्रिणीकडून केळवणाचं गिफ्ट मिळालं आहे. याचाही फोटो तिने शेअर केला आहे. 

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने बिग बॉसच्या घरात लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा खुलासा केला होता. बाहेर पडताच तिने फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असून लवकरच नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा पडदाही उलगडणार असल्याचं सांगितलं आहे. अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारअंकिता प्रभू वालावलकर