Join us  

काहींना ठरवूनही कुणाचा अपमान...; रितेशसाठी मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट, म्हणते- "सगळे त्याच्यावर चिडतात, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 1:26 PM

Bigg Boss Marathi Season 5 : गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यानंतर मात्र रितेशवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. काहींनी रितेशची तुलना महेश मांजरेकर यांच्याबरोबर केली होती. त्यानंतर आता मराठी अभिनेत्याच्या पत्नीने रितेशसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉस मराठीचा यंदा सीझन मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत आहे. बिग बॉस मराठीचा होस्ट म्हणून रितेशला पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण, गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यानंतर मात्र रितेशवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. काहींनी रितेशची तुलना महेश मांजरेकर यांच्याबरोबर केली होती. त्यानंतर आता मराठी अभिनेत्याच्या पत्नीने रितेशसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. 

अभिनेता अंशुमन विचारे याची पत्नी पल्लवी विचारे हिने तिच्या सोशल मीडियावर रितेशचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने रितेशला पाठिंबा देत त्याचं समर्थन आणि कौतुक केलं आहे. 

अंशुमन विचारेच्या पत्नीची पोस्ट 

काही माणस जन्मालाच इतकी गोड येतात की त्यांना ठरवून, अभिनय म्हणून सुद्धा कुणाचा अपमान नाही करता येत...सगळे रितेश देशमुखवर चिडतायत की त्याला ह्या लोकांशी घालून पाडून रागात त्यांची लायकी काढून बोलता येत नाही. पण कुणाला हेच कळत नाहीये की त्या माणसावर कुठल्या लेवलचे संस्कार आहेत की तो ठरवून पण असं बोलू शकत नाही...

 

ह्यात रितेशची चूक नाही. एक अभिनेता म्हणून तो पूर्ण जीव ओतून त्याचं काम करण्याचा प्रामणिक प्रयत्न करतोय. पण त्याच्या डोळ्यात त्याच्यातलं एक गोड माणूस इतका ताबा घेऊन असतो की आपल्याला अपेक्षित असलेली नजर त्यात दिसत नाही. हे माझ मतं आहे लोकांना कदाचित आवडणार नाही त्याबद्दल क्षमस्व...

पल्लवी विचारेच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं म्हणणं बरोबर असल्याचं म्हटलं आहे. त्याबरोबरच रितेशला पाठिंबाही दिला आहे. 

भाऊच्या धक्क्यावर रितेशने घेतली जान्हवीची शाळा

रितेशने भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची कानउघाडणी करत ती बिग बॉस मराठीच्या इतिसाहासातील सर्वात वाईट स्पर्धक असल्याचं म्हटलं. तसंच रितेशने जान्हवीला खोटं वागत असल्याचंही म्हटलं. गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला आलेली चक्करही तिने केलेलं नाटक असल्याचं म्हणत रितेशने जान्हवीला सुनावलं. "तुमचा माज, तुमची दादागिरी, तुमचा उर्मटपणा हे आज इथे बंद होणार आहे. तुम्ही सर्वांना म्हणता ना की, मी तुम्हाला बाहेर काढेन. जान्हवी आज मी तुम्हाला बाहेर काढतो", असं म्हणत रितेश जान्हवीला तुरुंगात टाकतो. आता जान्हवीला गार्डन एरियामधील जेलमध्ये १ आठवडा राहायची शिक्षा मिळाली आहे. त्याबरोबरच तिला या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावरही सहभागी होता येणार नसल्याचं रितेशने म्हटलं आहे.  जान्हवीनंतर रितेशने निक्कीलाही चांगलंच सुनावलं. निक्कीने पॅडीला जोकर म्हणून हिणवलं होतं. त्यावरुन रितेशने निक्कीला खडे बोल सुनावले. त्याबरोबरच निक्कीने अंकिताला "काम नाही म्हणून घरात आल्याचं" म्हटलं होतं. यावरुनही रितेशने निक्कीचा समाचार घेतला. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारअंशुमन विचारेमराठी अभिनेता