Join us  

ढाण्या वाघाला ट्रॉफी घेऊन येताना बघायचंय! मराठी अभिनेत्रीचा DP ला फूल सपोर्ट, शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 3:35 PM

कोल्हापूरचा डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार पहिल्या दिवसापासूनच त्याच्या अफलातून खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. आता खेळ अंतिम टप्प्यात आल्यानंतर धनंजय पोवारला वोट करण्यासाठी मराठी अभिनेत्रीलने चाहत्यांना आवाहन केलं आहे.

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी सीझन ५चा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. लवकरच बिग बॉस मराठीला या सीझनचा विजेता मिळणार आहे. बिग बॉसची ट्रॉफी नावावर करण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरचा डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार पहिल्या दिवसापासूनच त्याच्या अफलातून खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. आता खेळ अंतिम टप्प्यात आल्यानंतर धनंजय पोवारला वोट करण्यासाठी मराठी अभिनेत्री सोनाली पाटीलने चाहत्यांना आवाहन केलं आहे. 

सुरुवातीपासूनच सोनाली धनंजयला पाठिंबा देत आहे. डीपीसाठी अनेक व्हिडिओही तिने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले होते. आता सोनालीने धनंजयला फूल सपोर्ट दिला आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिए शेअर केला आहे. यामध्ये तिच्याबरोबर धनंजयची पत्नीही दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सोनाली म्हणते, "आज मी सोसायटी फर्निचरमध्ये आहे. या सोसायटी फर्निचरचा माणूस बिग बॉस मराठीच्या घरात आहे, हे सगळ्यांनाच माहितीये. त्याला आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. नुसतं व्हिडिओ बघू नका आपल्या भावाला वोट करा. कोल्हापुरात ट्रॉफी आणायची आहे. ढाण्या वाघाला ट्रॉफी घेऊन येताना बघायचंय". 

सोनालीबरोबर धनंजयची पत्नीही चाहत्यांना त्याला वोट करण्यासाठी आवाहन करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत दुकानात धनंजयचं मोठं पोस्टर लावल्याचं दिसत आहे. दरम्यान, आता घरात धनंजय पोवारबरोबर अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण हे सदस्य आहेत. आता यापैकी ट्रॉफी कोण जिंकणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार