Join us

BB Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार सुरांचा बादशहा, रोहित राऊत की अभिजीत सावंत? तुम्हीच ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 8:44 AM

यंदा लोकप्रिय गायकाची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री होणार आहे. प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणाऱ्या स्पर्धकाची झलक दाखविण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होण्यास आता अवघा एक दिवस बाकी आहे. यंदाचा सीझन मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे. सुरुवातीपासूनच या सीझनमध्ये एकामागोमाग एक सरप्राइजेस चाहत्यांना मिळत आहेत. त्यामुळे यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे. या सीझनबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत दिवसेंदिवस उत्सुकता वाढत आहे. अशातच आता 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. 

कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवरुन 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणाऱ्या स्पर्धकाची झलक दाखविण्यात आली आहे. यंदा लोकप्रिय गायकाची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये लोकप्रिय गायक राधा ही बावरी हे गाणं गाताना दिसत आहे. पण, या प्रोमोमध्ये त्याचा चेहरा दाखविण्यात आलेला नाही. त्यामुळे हा गायक नक्की कोण आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. 

या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट करत मात्र 'बिग बॉस मराठी'च्या घरातील हा स्पर्धक कोण आहे, ते ओळखण्यास सुरुवात केली आहे. काहींनी लोकप्रिय गायक अभिजीत सावंत तर काहींनी रोहित राऊतचं नाव कमेंट केलं आहे. अनेकांनी हा स्पर्धक स्वप्निल बांदोडकर असल्याचंही म्हटलं आहे. आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणारा हा गायक नक्की कोण आहे, हे २८ जुलैला कळेल. 

'बिग बॉस मराठी ५'मध्ये अभिनेता शुभांकर तावडे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हे स्पर्धक दिसणार असण्याची शक्यता आहे. रविवारी २८ जुलैला रात्री ९ वाजता याचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकाररितेश देशमुख