Join us

मालक अन् सांगकाम्यांमध्ये रंगणार जुगलबंदी! घरात रंगलेला नवा खेळ ऐकून सर्वांना धक्का पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:11 IST

बिग बॉस मराठीच्या घरात मालक अन् सांगकाम्यांचा खेळ रंगणार आहे (bigg boss marathi 5)

'बिग बॉस मराठी'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा सीझन सध्या चांगलाच टॉपवर आहे. महाराष्ट्रातील जनता दररोज रात्री ९ वाजता टीव्हीवर बिग बॉस बघायला उत्सुक असतात. काहीच दिवसात बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची फायनल रंगणार आहे.  दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो. आता फिनाले काहीच दिवस बाकी असताना घरात मालक आणि सांगकाम्यांचा टास्क रंगणार आहे,

मालक - सांगकाम्यांमध्ये रंगणार जुगलबंदी

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"या आठवड्यात आपल्यातील काही सदस्य ठरतील सांगकामे आणि उर्वरीत सदस्य ठरतील त्यांचे मालक. मालकांनी सांगितलेली त्यांची वैयक्तिक कामेसुद्धा त्यांना करावी लागतील". त्यामुळे आज घरात रंगत येणार आहे. कोण कोणाला काय कामे देणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. ही घोषणा ऐकताच जान्हवी, निक्की, वर्षा उसगांवकर, अंकिता अशा सर्वांनाच चांगला धक्का बसलाय.

निक्की आणि DP दादामध्ये बाचाबाची

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात निक्की, अभिजीत, डीपी दादा आणि अंकिता एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहे. निक्की म्हणतेय,"तिकीट टू फिनाले म्हणजे काय टॉप 5.". त्यावर डीपी दादा म्हणतात,"मी तुला टॉप 5 मध्ये पाहतोय". निक्की म्हणते,"माझं तुम्हाला सांगणं हे कर्तव्य आहे". डीपी दादा पुढे निक्कीला म्हणतात,"जसं तुला वाटतंय ना हा व्यक्ती घरात करतोय काय? कशासाठी आलाय". त्यावर निक्की म्हणते,"मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतेय तुम्ही काल माझं तिकीट टू फिनाले काढलं...पण त्यासाठी तुम्ही दिलेलं कारण हीच माझी समस्या आहे". 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन