Join us  

निक्की-जान्हवीचं चाललंय तरी काय? आधी भांडल्या आता पुन्हा एकत्र आल्या, अंकिताला म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 2:14 PM

Bigg Boss Marathi Season 5 : एकीकडे कडाडून भांडणाऱ्या जान्हवी आणि निक्कीमध्ये पुन्हा मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंकितामुळे जान्हवी आणि निक्कीमध्ये एकमत झाल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर असताना घरातील समीकरणं पुन्हा बदलत असल्याचं दिसत आहे. एकीकडे कडाडून भांडणाऱ्या जान्हवी आणि निक्कीमध्ये पुन्हा मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंकितामुळे जान्हवी आणि निक्कीमध्ये एकमत झाल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओत निक्की आणि जान्हवी बेडरुममध्ये अंकिताबद्दल बोलत असल्याचं दिसत आहे. निक्की जान्हवीला म्हणते, "तुला मी खरं सांगू हे एवढं घाण दिसणारे. कारण, तिने पलटली आहे. आर्याला मी जेवणापासून अडवलं होतं. तेव्हा मला ओरडा पडला होता. अंकिताने तेव्हा स्डँड घेतला होता. ते बरोबर होतं. आज ती स्वत: तेच करतेय". त्यावर जान्हवी तिला "तुझा मुद्दा बरोबर होता" असं म्हणते. "तिने मला विचारलंच नाही. म्हणजे तिने माझ्यासाठी ब्रेकफास्टच बनवला नाही. मग तिने ब्रेकफास्टची ड्युटी का घेतली?", असं निक्की जान्हवीला म्हणत आहे. 

त्यानंतर जान्हवी निक्कीला म्हणते की "मी तिला सांगितलं ना तुझी चूक झाली आहे". निक्की जान्हवीची बाजू घेत तिला म्हणते, "तू टास्कमध्ये हरल्यानंतर सांगकाम्या बनून सूरजसाठी जेवण बनवलं. मी हे करणार नाही, असं तुला म्हणता आलं असतं. पण, तू तसं केलं नाही. ही खूप कुचकी आहे. एक नंबरची कुचकी पोरगी आहे ही". निक्की-जान्हवीचा हा व्हिडिओ पाहून या दोघींमध्ये पुन्हा मैत्री झाली का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

दरम्यान, या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. निक्कीने फिनालेचं तिकीट मिळवून ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर वर्षाताई, अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, आणि धनंजय यांच्यावर नॉमिनेशनची तलवार आहे. या आठवड्यातही एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारअंकिता प्रभू वालावलकर