Join us  

आधी Heart दिलं मग Hurt केलं! निक्की-अरबाजमध्ये वादाची ठिणगी, प्रेम सुरू होण्याआधीच ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 12:52 PM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यापासूनच निक्की आणि अरबाजमध्ये स्ट्राँग मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांच्यात प्रेमाचे वारेदेखील वाहू लागले होते. आता मात्र या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी ५ सुरू होईन आता एक आठवडा झाला आहे. पहिल्या आठवड्यानंतर आता घरातील समीकरणंही हळूहळू बदलायला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यापासूनच निक्की आणि अरबाजमध्ये स्ट्राँग मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांच्यात प्रेमाचे वारेदेखील वाहू लागले होते. प्रत्येकवेळी अरबाज आणि निक्की एकमेकांची बाजू घेताना दिसून यायचे. अरबाजने निक्कीसाठी टोमॅटोचं हार्टही बनवलं होतं. एवढचं काय तर घरातील काही सदस्यही निक्कीला वहिनी म्हणून हाक मारू लागले होते. आता मात्र या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. 

बिग बॉसच्या घरातील एक नवीन प्रोमो व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत निक्की आणि अरबाजमध्ये मतभेद झाल्याचं दिसत आहे. व्हिडिओत निक्की म्हणते की "आपण त्याच्यावर अटॅक केला,त्यामुळे आपण चुकीचे दिसतोय". त्यावर अरबाज म्हणतो, "मी त्याच्या जॅकेटमधून फक्त चष्माचा बॉक्स काढला, बघितला आणि मी बाहेर आलो". निक्की म्हणते की "ही मस्करी सुरू होती. पण जो सीन तयार झाला ना त्याच्यामुळे आपण वाईट दिसलोय". निक्कीच्या या बोलण्यावर अरबाज भडकतो. "कुठे वाईट दिसलोय? एवढे तुम्ही नाजूक आहात तर घरी बसा. माझ्या बॉडीला टच झालं तरी मी बोलणार.  आणि तू त्याची साईट घेऊ नको", असं म्हणत अरबाज तिथून निघून जात असल्याचं दिसत आहे. 

अरबाज निघून गेल्यानंतर निक्की त्याला म्हणते, "तू मला अॅटिट्यूड दाखवू नको". त्यावर अरबाज म्हणतो की "अॅटिट्यूड तू दाखवत आहेस". त्यानंतर मात्र निक्कीचा राग अनावर होतो. निक्की म्हणते, "मी तुला अॅटिट्यूड दाखवत नाहीये. तू इथून निघून गेलास. मी इथे गप्प उभी आहे. तू माझा अनादर केला आहे. आता त्याने आदर केल्याशिवाय मी परत येणार नाही". 

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार, पुरुषोत्तमदादा पाटील हे सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यांच्यापैकी किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. पुरुषोत्तम दादा पाटील हे यंदाच्या सीझनमधील बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारे पहिले स्पर्धक ठरले आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार