Join us  

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच निक्कीची अरबाजबरोबर डिनर डेट, कॅमेऱ्यात झाले स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 9:46 AM

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच निक्की आणि अरबाज यांना स्पॉट करण्यात आलं आहे. निक्की आणि अरबाजचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. टॉप ३ स्पर्धकांमध्ये जागा बनवणारी निक्की तांबोळी ही बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा होती. बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाज पटेलमध्ये पहिल्या दिवशीच चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर त्यांच्यातील जवळीकही वाढली होती. अरबाज घरातून बाहेर गेल्यानंतरही निक्की ढसाढसा रडली होती. 

त्यानंतर मात्र त्यांच्यात मतभेद झाल्याचं दिसत होतं. अरबाजने शेवटच्या दिवशी बिग बॉसच्या घरात येताच निक्कीला मिठी मारत त्यांच्यातील गैरसमज दूर केले होते. पण, अरबाज आणि निक्कीचं हे प्रेम प्रकरण फक्त बिग बॉसच्या घरापुरतं असल्याची चर्चा होती. पण, बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच निक्की आणि अरबाज यांना स्पॉट करण्यात आलं आहे. निक्की आणि अरबाजचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

बिग बॉस मराठी संपताच निक्की आणि अरबाज डिनर डेटसाठी गेले होते. तिथे त्यांना स्पॉट करण्यात आलं. वरिंदर चावला या इन्स्टाग्राम पेजवरुन निक्की आणि अरबाजचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये निक्की आणि अरबाज एकत्र कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहेत. तर निक्कीनेही तिच्या इन्स्टाग्रामवरुन अरबाजबरोबरचा डिनर डेटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

बिग बॉस मराठीचं घर डोक्यावर घेणारी निक्की यंदाच्या पर्वाच्या टॉप ३ मध्ये पोहोचली होती. पण, तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला. गोलीगत किंग सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी ५च्या ट्रॉफीवर नाव कोरलं.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार