Join us  

आधी भांड भांड भांडले अन् मग मिठीत शिरले! अरबाज-निक्कीचं चाललंय तरी काय? करत्यात वेगळाच गेम प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 9:02 AM

Bigg Boss Marathi Season 5 : या आठवड्याच्या सुरुवातीला अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र त्यांचा वेगळाच गेम प्लॅन असल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन एक महिना झाला आहे. महिन्याभरानंतर बिग बॉसच्या घरातील मैत्रीची समीकरणं पुन्हा बदललेली पाहायला मिळत आहे. टीम A मधील सदस्यांमध्ये फूट पडली आहे. एवढंच नाही तर अरबाज आणि निक्कीच्या नात्यातही दुरावा आल्याचं पाहायला मिळालं होतं. या आठवड्याच्या सुरुवातीला अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 

राग अनावर झाल्याने अरबाजने घरातील सामानाची तोडफोडही केली होती. निक्कीबरोबरच्या भांडणात घरातील सगळे सदस्य अरबाजबरोबर होते. सगळ्यांनी अरबाजला सपोर्ट करत निक्कीला एकटं पाडलं होतं. निक्कीच्या वागण्यामुळे अरबाजला त्रासही झाला होता. त्याला अश्रूही अनावर झाले होते. पण, आता मात्र त्यांचा वेगळाच गेम प्लॅन असल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील निक्की आणि अरबाजचा व्हिडिओ समोर आला आहे. 

यामध्ये आधी भांड भांड भांडलेले निक्की आणि अरबाज वॉशरुममध्ये बोलताना दिसत आहेत. भांडण मिटवून ते एकमेकांच्या मिठीत शिरत असल्याचं दिसत आहे. निक्की आणि अरबाजमधील भांडण मिटल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर निक्की अरबाजला म्हणते की "आपण सगळ्यांसमोर असं नाही वागू शकत. त्यांना परत वेगळं वाटेल. टास्कमध्ये आपण एकत्र खेळू". त्यानंतर रात्री सगळे झोपल्यानंतर अरबाज निक्कीच्या कॅप्टन्सी रुममध्ये गेल्याचं दिसलं होतं. त्यामुळे घरातील इतर सदस्यांना निक्की आणि अरबाज वेड बनवत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, अरबाजने भांडणात घरात तोडफोड केली, त्यामुळे बिग बॉसने त्याला शिक्षा सुनावली आहे. आता अरबाजला या आठवड्याच्या कॅप्टन्सी कार्यात सहभाग घेता येणार नाहीये. यंदाच्या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले होते. परंतु, या आठवड्यात वोटींग लाइन्स बंद असल्याने कोणीही घराबाहेर जाणार नाही. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार