Join us  

'बिग बॉस'च्या घरात अरबाज-निक्कीचा रोमान्स, "हिल हिल पोरी हिला" गाण्यावर केला जबरदस्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 10:28 AM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या या पर्वाचा नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अरबाज आणि निक्की रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा हा नवा सीझन चांगलाच चर्चेत आहे. या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलमध्ये चांगली मैत्री झाल्याचं दिसत होतं. तर काही दिवसांनंतर त्यांच्या प्रेम फुलू लागल्याचं पाहायला मिळालं. घरातील सदस्यही अरबाज आणि निक्कीला चिडवू लागले होते. त्या दोघांमध्येही भांडण आणि पॅचअपचा गेम सुरू आहे. आता अरबाज आणि निक्की घरात रोमँटिक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

बिग बॉसच्या या पर्वाचा नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अरबाज आणि निक्की रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. निक्कीने नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला आहे. तर अरबाजने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. हिल हिल पोरी हिला या गाण्यावर दोघेही जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

दरम्यान, पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेली आणि बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारी निक्की या आठवड्यात नॉमिनेट झाली आहे. दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कनंतर बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये निक्कीबरोबर योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार