Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदी बिग बॉसमधील स्पर्धक अभिनेत्री निक्की तांबोळीने मराठीत एन्ट्री घेतली आहे. आज बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला दणक्यात झाली आहे. रितेश देशमुख पहिल्यांदाच शो होस्ट करतोय. नुकतंच निक्कीतांबोळीने घरात प्रवेश केला असून तिने येताच अनेक मागण्या केल्या आहेत.
रितेश देशमुखने निक्की तांबोळीचं स्वागत केलं. ती म्हणाली, "मी मराठीच आहे. डोंबिवलीची आहे.' निक्कीला कॉफी अत्यंत प्रिय आहे. ती त्याशिवाय जगू शकत नाही. बिग बॉसच्या घरात काहीच मोफत मिळणार नसल्याचं रितेशने तिला सांगितलं. रितेशने तिच्यासमोर कॉफी किंवा १० हजारांची bb करन्सी हे पर्याय ठेवले. तेव्हा निक्कीने कॉफीचा पर्याय निवडला. इतर स्पर्धकांचा विचार मी का करु? असं म्हणत तिने आपली प्रिय कॉफी घेतली आणि तिने घरात प्रवेश केला. याशिवाय घरात गुड लुकिंग मुलंही असावेत अशीही अनोखी मागणी तिने केली. तिच्या या मागणीनंतर पुढचे स्पर्धक अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण यांची एन्ट्री झाली.
निक्की तांबोळी याआधी बिग बॉस हिंदी 14 व्या सीझनमध्ये दिसली होती. यात ती टॉप 3 पर्यंत पोहोचली होती. आता मराठी बिग बॉसमध्ये ती काय हवा करते हे पाहणं महत्वाचं आहे.
आतापर्यंत घरात वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निखिल दामलेने, इरिना रुडाकोवा, वैभव चव्हाण, घन:श्याम दरवडे आणि अरबाज पटेल यांनी एन्ट्री घेतली आहे.