Join us

पॅडीसमोर होणार DP आणि अंकिताची पोलखोल, अभिनेता म्हणाला- "प्रत्येक गोष्टीत त्यांनी स्वार्थ पाहिला, पण मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 16:02 IST

भाऊच्या चक्रव्युहात पॅडीदादासमोर घरातील सदस्यांची पोलखोल होणार आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : या आठवड्यातील भाऊचा धक्का खऱ्या अर्थाने खास असणार आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्रीपासून ते टास्कदरम्यान झालेला राडा बिग बॉसच्या घरात या आठवड्यात पाहायला मिळाला. या सगळ्याचा रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर समाचार घेणार आहे. तर भाऊच्या चक्रव्युहात प्रत्येक आठवड्यात पोलखोल केली जाते. या आठवड्यात पॅडीदादासमोर धनंजय आणि अंकिताची पोलखोल होणार आहे. 

भाऊच्या चक्रव्युहात पॅडीदादासमोर घरातील सदस्यांची पोलखोल होणार आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत चक्रव्युहात अडकलेल्या पॅडीसमोर घरातील सदस्यांचे काही व्हिडिओ दाखवले गेल्याचं दिसत आहे. यामध्ये अंकिता आणि DP दादाचा व्हिडिओही आहे. हा व्हिडिओ पाहून पॅडी म्हणतो, "त्यांनी प्रत्येक गोष्टीत त्यांचा स्वार्थ बघितला असेल. घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना कळेल की आपण तेव्हा बोललेलो चुकीचं होतं. कारण मी कधीच स्वार्थीपणे कुठलीही गोष्ट केलेली नाही. त्यामध्ये नेहमी निस्वार्थ भावना असते". 

या व्हिडिओनंतर आता B टीममध्येही फूट पडणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, घरात संग्राम चौगुलेने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यानंतर घरातील समीकरणं बदलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बिग बॉसचा खेळ दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात अग्रेशनच्या सगळ्या सीमा पार करण्यात आल्या. धक्काबुक्कीत आर्याला निक्कीचा हात लागला. त्यानंतर आर्याचा संयम सुटला आणि आता मारेल असं म्हणत तिने निक्कीच्या कानशिलात लगावली. आर्याने बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आता तिला काय शिक्षा मिळणार हे पाहावं लागेल. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार