Join us  

Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 1:59 PM

Bigg Boss Marathi 5: 'भाऊच्या धक्क्या'वर गेले दोन आठवडे रितेश भाऊची कमतरता जाणवली. त्याची सदस्यांची शाळा घेण्याची हटके शैली आणि कल्ला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण आता मात्र भाऊ इज बॅक! रितेश भाऊंच्या शेवटच्या 'भाऊच्या धक्क्या'ची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे.

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi Season 5) मुळे चांगलाच चर्चेत आहे. पाचव्या सीझनच्या सूत्रसंचालनाची धुरा रितेश भाऊ सांभाळत आहेत. सदस्यांना पाठिशी घातल्यामुळे, त्यांचे कौतुक केल्यामुळे तर कधी त्यांची पाठ थोपटल्याने रितेश यांचा 'बिग बॉस मराठी'मधला 'भाऊचा धक्का' चर्चेत राहिला. याचे परिणाम टीआरपीतही दिसले आहेत. मागील दोन आठवडे रितेश देशमुख परदेशात चित्रीकरणासाठी गेल्यामुळे त्याला 'भाऊचा धक्का' करता आला नाही. पण आता मात्र भाऊ इज बॅक! रितेश भाऊंच्या शेवटच्या 'भाऊच्या धक्क्या'ची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. 

'भाऊच्या धक्क्या'वर गेले दोन आठवडे रितेश भाऊची कमतरता जाणवली. त्याची सदस्यांची शाळा घेण्याची हटके शैली आणि कल्ला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील चावीचे माकड, घरातलं डोअरमॅट अशा अनेक उपमा त्याने सदस्यांना दिल्या. सोशल मीडियावर याचे मीम्सदेखील व्हायरल झाले. एका 'भाऊच्या धक्क्या'नंतर दुसऱ्या 'भाऊच्या धक्क्या'ला काय होणार? रितेश भाऊ काय धमाका करणार याची संपूर्ण महाराष्ट्रालाच प्रतीक्षा होती. त्याच्या गैरहजेरीत प्रेक्षक त्याला खूप मिस करत होते. आता 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेला धुमाकूळ घालण्यासाठी रितेश भाऊ सज्ज झाला आहे.

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा मंच सुपरस्टार रितेश देशमुखने दणाणून सोडला आहे. आपल्या खास स्टाइलने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. भाऊच्या धक्क्यावर सदस्यांचा योग्य पद्धतीने हिशोब घेण्यात रितेश भाऊ यशस्वी झाले आहेत. 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन खूपच वेगळा असून इतर सीझनपेक्षा अनेक हटके गोष्टी यंदा पाहायला मिळत आहेत. ग्रँड फिनालेदेखील असाच दमदार सरप्राईजने भरलेला असेल. या ग्रँड फिनालेला रितेश भाऊ काय धमाका करणार याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

टॅग्स :रितेश देशमुखबिग बॉस मराठी