Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी'च्या 'या' माजी स्पर्धकाने बनवलंय 'भाऊचा धक्का' गाणं, रितेशभाऊंनी सांगितलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 14:15 IST

बिग बॉस मराठीमधल या माजी स्पर्धकाने रितेश देशमुखवरील 'भाऊचा धक्का' गाणं लिहिण्याची जबाबदारी पार पाडण्यात आली (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. एकामागून एक स्पर्धक या सीझनमध्ये कल्ला करत आहेत. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये नुकताच पहिला विकेंड का वार रंगला. यावेळी रितेशने सदस्यांची शाळा घेण्याआधी त्यांना बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचं नवं थीम सॉंग ऐकवलं. भाऊचा धक्का असं शीर्षक असलेलं हे कमाल गाणं अल्पावधीतच व्हायरल झालं. हे गाणं बिग बॉस मराठीच्या एका माजी स्पर्धकाने लिहिलंय असा खुलासा रितेशने यावेळी केला. कोण आहे हा स्पर्धक.

या माजी स्पर्धकाने लिहिलंय भाऊचा धक्का

रितेश देशमुखवर चित्रित झालेलं बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचं थीम सॉंग लिहिलंय उत्कर्ष शिंदेने. हो तुम्ही बरोबर वाचताय. स्वतः रितेशने शनिवारी गाणं लॉंच करताना याविषयी खुलासा केला. उत्कर्षने फक्त गाणं लिहिलं नाही तर त्याला संगीत दिलंय. याशिवाय तो हे गाणं गायलाही आहे. उत्कर्षचं नाव घेताच सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट करुन त्याने लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्याला दाद दिली.

उत्कर्ष 'भाऊचा धक्का'बद्दल काय म्हणाला

या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत उत्कर्ष लिहितो,  "ज्या बिगबॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून नाव वाढवता आलं. ज्या बिगबॉसने मास्टरमाईंड, ऑलराउंडर,टास्क मास्टर,एंटरटेनमेंटकिंग अशी नावे देऊन वेगळी ओळख दिली.त्याच कर्मभूमी साठी ,त्याच घरासाठी,त्या माझ्या बिगबॉस मराठी ५ साठी हे “भाऊचा धक्का “थीम सॉंग बनवण्याची संधी मिळाली. जिथे पुन्हाः हा गाण्याचा टास्क एका दिवसात मी कंप्लिट केला गायक,गीतकार,संगीतकार म्हणून. ही कामगिरी पार पाडताना लीजेंड केदार शिंदे सर ह्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. त्यांची एनर्जी बघून खूप काही शिकायला मिळालं."

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखकलर्स मराठी