Join us  

Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून सूरजला 'बिग बॉस'च्या घरात हवीये मुलगी, लाजत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 12:02 PM

Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून कोण येणार? याबाबत घरातील सदस्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सूरजला मात्र वाइल्ड कार्ड म्हणून घरात मुलगी हवी आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने गुलीगत यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा मान मिळवला. त्यामुळे सूरजची क्रेझ आणखीनच वाढली आहे. सूरजचा बिग बॉसच्या घरातील खेळ चाहत्यांनाही आवडत आहे. त्यामुळेच त्याचा चाहत्यांचा फूल सपोर्टही मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी घरातील सदस्यही उत्सुक आहेत. पण, वाइल्ड कार्ड म्हणून कोण येणार? याबाबत घरातील सदस्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सूरजला मात्र वाइल्ड कार्ड म्हणून घरात मुलगी हवी आहे.

सूरजचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये घरातील सदस्य गार्डन एरियामध्ये बसून चर्चा करताना दिसत आहेत. वैभव अंकिताला म्हणतो की सूरजला घरात वाइल्ड कार्ड म्हणून मुलगी हवी आहे. त्यावर अंकिता सूरजला म्हणते, "तू चुकीचा गेम समजतोस. तू जरा थंड घे". त्यावर निक्की लगेच सूरजला म्हणते की "मी तुझ्या सपोर्टमध्ये आहे". सूरज लाजत असलेला पाहून अरबाजलाही हसू येतं. अंकिता म्हणते, "पॅडी दादा, इकडे या. याला समजावता समजावता हा चुकीचा गेम समजायला लागला आहे. मगापासून सगळे म्हणतात की कोणीतरी आज येणारे. हा म्हणतो की कोणतरी पोरगी यायला पाहिजे". त्यानंतर सूरज लाजत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

त्यानंतर पॅडी दादा सूरजला म्हणतात, "तू पटवशील त्या मुलीला?". सूरज मान हलवत हो म्हणतो. त्यानंतर डीपी दादा म्हणतात, "सूरज आज जर पोरगी आली. तर तिच्याबरोबर तुझं प्रेमप्रकरण मी पूर्ण करून देईन". बिग बॉसच्या घरातील सूरजचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.  दरम्यान, या आठवड्यात संग्राम चौघुले बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार आहे. संग्रामच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे पुन्हा घरातील समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळणार आहे. घरात येताच संग्रामने अरबाज आणि निक्कीला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार