Join us

"मी फोडणार आणि फाडणार", आता बिग बॉसच्या घरात सूरज झापूक झुपूक खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 11:25 AM

यंदाच्या आठवड्यात नॉमिनेट झाल्याने सूरजने चांगला गेम खेळण्याचा निर्धार केला आहे. त्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमझ्ये पहिल्या दिवसापासूनच रीलस्टार सूरज चव्हाण प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत आहे. त्याची झापूक झुपूक स्टाइल रितेश देशमुखलाही प्रचंड आवडते. सूरजला त्याच्या चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे. यंदाच्या आठवड्यात नॉमिनेट झाल्याने सूरजने चांगला गेम खेळण्याचा निर्धार केला आहे. त्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओत सूरज आणि पॅडी दादा गार्डन एरियात एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. पॅडी सूरजला म्हणतो, "पुढच्या वेळेस नॉमिनेशन प्रक्रियेत माझ्याकडून तुझं नाव असेल". त्यावर सूरज म्हणतो, "मी घाबरत नाही. तुम्ही कितीही काहीही करा". मग पॅडी त्याला "मी काय तुला घाबरतो होय रे", असं म्हणतो. "मी कोणालाच घाबरत नाही. मी फोडणार आणि फोडणार", असं सूरज म्हणताना दिसत आहे. 

त्यानंतर पॅडीबरोबर त्याची मजा सुरू असल्याचं दिसत आहे. पॅडीच्या पोटावर हात ठेवत तो म्हणतो, "तुमच्या पोटाच्या मी चकल्या करेन". त्यावर पॅडी म्हणल्यावर सूरज त्यांना म्हणतो, "तुम्ही गप्प बसा. तोंडावर बोट ठेवायचं आणि एक शब्दही बोलायचा नाही". सूरजने बुक्की हाणू का? असं म्हटल्यावर पॅडी म्हणतो, "तू काहीही करू शकतोस. तू किंग आहेस".  दरम्यान, यंदाच्या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी यांच्याबरोबरच धनंजय पोवार यांनाही नॉमिनेट केलं. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार