Join us  

"आज शांतपणे झोप लागेल", रितेशने निक्की आणि जान्हवीला सुनावल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 10:10 AM

Bigg Boss Marathi Season 5 : भाऊच्या धक्क्यावर रितेशने टीम B च्या खेळाचं कौतुक करत टीम A मधील सदस्यांना डोकं नसल्याचंही म्हटलं. भाऊच्या धक्क्यानंतर मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीला पॅडी कांबळेचा अपमान केल्याबद्दल खडे बोल सुनावले. रितेशने जान्हवीची एका आठवड्यासाठी थेट तुरुंगात रवानगी केली. तर निक्कीलाही चांगल्याच शब्दांत सुनावलं. भाऊच्या धक्क्यावर रितेशने टीम B च्या खेळाचं कौतुक करत टीम A मधील सदस्यांना डोकं नसल्याचंही म्हटलं. भाऊच्या धक्क्यानंतर मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

"लव्ह यू रितेश भाऊ...आज शांतपणे झोप लागेल...भावा आज प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिलीत. प्रत्येकाच्या चुका दाखवून दिल्या...त्याबद्दल धन्यवाद...याचीच वाट पाहत होतो. घरातल्या कुठल्याही सदस्याशी माझं वैयक्तिक भांडण नाही. पण, जे दिसत होतं ते खूपच वाईट होतं. तुम्ही जेव्हा म्हणालात की अरबाज निक्की आणि ती बाहेर बसलेली जिचं नावही तुम्हाला घ्यायची इच्छा नाही...हे तिघं तुम्ही बोलत असताना हसत असतात, हे खरं आहे. तुम्ही दिलेलं उत्तर लय भारी "मी रितेश विलासराव देशमुख आहे मला हलक्यात नाही घ्यायचं..." ए टीमला त्यांच्या चुकांबद्दल ऐकवणं गरजेचं होतं आणि ते तुम्ही योग्य शब्दातून त्यांना ऐकवलंत. बाकी बी टीमची तारीफ करावी असंच ते खेळले आहेत...असा भाऊचा धक्का पाहायला नक्की आवडेल...लव्ह यू रितेश भाऊ", असं सुरेखा कुडची यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

रितेश देशमुख काय म्हणाला? 

रितेशने भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची कानउघाडणी करत ती बिग बॉस मराठीच्या इतिसाहासातील सर्वात वाईट स्पर्धक असल्याचं म्हटलं. तसंच रितेशने जान्हवीला खोटं वागत असल्याचंही म्हटलं. गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला आलेली चक्करही तिने केलेलं नाटक असल्याचं म्हणत रितेशने जान्हवीला सुनावलं. "तुमचा माज, तुमची दादागिरी, तुमचा उर्मटपणा हे आज इथे बंद होणार आहे. तुम्ही सर्वांना म्हणता ना की, मी तुम्हाला बाहेर काढेन. जान्हवी आज मी तुम्हाला बाहेर काढतो", असं म्हणत रितेश जान्हवीला तुरुंगात टाकतो. आता जान्हवीला गार्डन एरियामधील जेलमध्ये १ आठवडा राहायची शिक्षा मिळाली आहे. त्याबरोबरच तिला या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावरही सहभागी होता येणार नसल्याचं रितेशने म्हटलं आहे. 

जान्हवीनंतर रितेशने निक्कीलाही चांगलंच सुनावलं. निक्कीने पॅडीला जोकर म्हणून हिणवलं होतं. त्यावरुन रितेशने निक्कीला खडे बोल सुनावले. त्याबरोबरच निक्कीने अंकिताला "काम नाही म्हणून घरात आल्याचं" म्हटलं होतं. यावरुनही रितेशने निक्कीचा समाचार घेतला. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात आता हळूहळू सदस्यांमधील समीकरणं बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा आणि आर्या जाधव हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात कोणाचा प्रवास संपतो, हे रविवारी कळेल.  

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखटिव्ही कलाकार