Join us  

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांची जेवणासाठी उडणार धांदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 1:31 PM

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतो. घरात दररोज काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi Season 5)च्या घरात नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतो. घरात दररोज काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. घरात सध्या जंगल राज सुरू आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान वर्षा ताई आणि अरबाज यांचे भांडण होणार आहे. सर्व सदस्यांची धांडल उडणार आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना वेळेवर जेवण मिळणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले आहे.

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, डीपी दादा भांडी वाजवत 'बिग बॉस'ला गॅस सुरू करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर अंकिता गॅस सुरू करताना दिसत आहे. घड्याळ लावून घरातील काही सदस्य जेवण बनवताना दिसत आहेत. नंतर अरबाज म्हणतोय,"बिग बॉस' गॅस बंद करा". पुढे वर्षा ताई म्हणत आहेत,"राईचा पर्वत करायचाय उगाच". अरबाज पुढे म्हणतोय, "फेकलं गरम पाणी तिकडे जाऊन".

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात डीपी दादा अभिजीतला म्हणत आहे,"हत्ती आणि गेंडा तू कधी पट्ट्याचा पट्ट्याचा बघितला आहेस?". त्यावर अभिजीत उत्तर देतो,"मी अंदाज बांधत होतो". दरम्यान बिग बॉस अभिजीतला म्हणतात,"अभिजीत एक प्रश्न पडलाय. आपण व्हेज आहात की नॉन-व्हेज?". शेवटी जान्हवी म्हणतेय,"काकाकुवा हा प्राणी मी शेवटपर्यंत विसरणार नाही".  

टॅग्स :बिग बॉस मराठी