Join us  

लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 5:20 PM

'बिग बॉस मराठी'च्या या सीझनमध्ये अनेक सरप्राइजेस चाहत्यांना मिळाले. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक ट्विस्ट असल्याने हा सीझन खऱ्या अर्थाने खास होता. त्यामुळे यंदाच्या सीझनची ट्रॉफीही खास असणार आहे. 

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा शेवटचा आठवडा सुरू आहे. हा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसांवर 'बिग बॉस मराठी' सीझन ५चा ग्रँड फिनाले आला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनमध्ये अनेक सरप्राइजेस चाहत्यांना मिळाले. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक ट्विस्ट असल्याने हा सीझन खऱ्या अर्थाने खास होता. त्यामुळे यंदाच्या सीझनची ट्रॉफीही खास असणार आहे. 

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री अमृता खानविलकर 'बिग बॉस'च्या घरात येत असल्याचं दिसत आहे.  अमेय आणि अमृता मिळूनच यंदाच्या ट्रॉफीचं अनावरण करत असल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस मराठी ५'ची ट्रॉफीदेखील खास आहे. 'बिग बॉस मराठी ५'चा लोगो असलेला डोळा मध्यभागी ठेवण्यात आला आहे. तर पाठीमागे यंदाची थीम असलेलं चक्रव्यूह देण्यात आलं आहे. 

दरम्यान, ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. वर्षा उसगावकर यांनी गुरुवारी(३ ऑक्टोबर) बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. आज आणखी एक सदस्य बिग बॉस मराठीचा निरोप घेणार आहे. त्यामुळे या सीझनचे टॉप ५ आज मिळणार आहेत. सध्या अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, धनंयज पोवार या सदस्यांमध्ये ट्रॉफीसाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार