Join us  

माझ्यासाठी तूच विनर! अंकिता वालावलकरला मराठी अभिनेत्याचा फूल सपोर्ट, म्हणतो- "आमची कोकणकन्या..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:17 AM

अंकिता वालावलकरला 'बिग बॉस मराठी'च्या घरात पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला बिग बॉसच्या घरात पाहून अनेकांनी ट्रोलही केलं आहे. पण, मराठी अभिनेत्याने कोकण हार्टेड गर्लला फूल सपोर्ट केला आहे.

Bigg Boss Marathi 5: टीव्हीवरील वादग्रस्त पण तितक्याच आवडीने पाहिला जाणार शो म्हणजे बिग बॉस. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाला अखेर सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर 'बिग बॉस मराठी ५'मधील स्पर्धकांच्या चेहऱ्यांवरुन रविवारी पडदा हटविण्यात आला आहे. यंदाच्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर सहभागी झाली आहे. 

अंकिता वालावलकरला 'बिग बॉस मराठी'च्या घरात पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला बिग बॉसच्या घरात पाहून अनेकांनी ट्रोलही केलं आहे. पण, मराठी अभिनेत्याने कोकण हार्टेड गर्लला फूल सपोर्ट केला आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता अभिजीत केळकरने अंकिता वालावकरच माझ्यासाठी विनर असल्याचं म्हटलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेताच अंकिताच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत कोकण हार्टेड गर्ल चाहत्यांना आवाहन करताना दिसत आहे. अंकिताच्या या व्हिडिओवर अभिजीत केळकरने कमेंट केली आहे. 

"माझ्यासाठी तू विनर आहेस. मी आत्ताच जाहीर करतो. all the power, luck and my best wishesh to you...जय मालवण, जय कोकण", अशी कमेंट अभिजीत केळकरने केली आहे. याशिवाय अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक कोकण हार्टेड गर्लसाठी पोस्टही केली आहे. "बिग बॉस मराठी ५मधली माझी सगळ्यात आवडती स्पर्धक म्हणजे आमची कोकणकन्या... माझा तिला फूल सपोर्ट, तीच जिंकणार", असं अभिजीतने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारअभिजीत केळकरमराठी अभिनेता