Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहेत. ९०चं दशक गाजवलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी यंदाच्या सीझनच्या पहिल्या स्पर्धक म्हणून 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'च्या घरात वर्षा यांचा दरारा पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा यांनी रितेश देशमुखबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
"रितेशने मला चुकीचं सांगितलं. माझी दिशाभूल केली", असं वर्षा उसगावकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात म्हणाल्या. 'बिग बॉस मराठी'चा होस्ट असलेल्या रितेशबद्दल असं वक्तव्य करताच बिग बॉसनेही मग त्यांची शाळा घेतली. त्याचं झालं असं की पहिल्याच दिवशी 'बिग बॉस मराठी'च्या घरात स्पर्धकांना सरप्राइज मिळालं. घरातील पाणी बंद झाल्याने स्पर्धकांच्या तोडचं पाणीच पळालं. शिवाय स्पर्धकांना घरात खाण्यासाठीही काहीही नसल्यामुळे वर्षा उसगावकर यांची चिडचिड होत होती.
वर्षा यांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेताना बिग बॉस करन्सी न घेता ड्यूटी फ्री पॉवर कार्ड घेतलं होतं. म्हणजे त्यांनी पूर्ण आठवडाभर घरातील कोणतंच काम करायला लागणार नाही. पण, घरात पाणी आणि खाण्यासाठी काहीही नसल्याने त्यांनी "पॉवरचा काही फायदाच नाही. रितेशने माझी दिशाभूल(missguide) केली. मी याचा निषेध करते. नको ती पॉवर" असं वक्तव्य केलं. वर्षा उसगावकर यांच्या या वक्तव्यानंतर बिग बॉसने त्यांची शाळा घेतली. बिग बॉस त्यांना म्हणालं, "वर्षा आपल्याला कोण कसं मिसगाईड करेल?". त्यावर वर्षा उसगावकर म्हणाल्या, "त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नुसतं बसायचं आणि एन्जॉय करायचं".
त्यानंतर बिग बॉस त्यांना म्हणाले की "आपण इतकी वर्ष सगळ्यांना गाइड करताय. आपण या घराला कसं गाईड करताय, तेदेखील मी पाहतो आहे. काही लोकांना ते आवडतंय काहींना ते पटत नाहीये. ते तुमचं तुम्ही ठरवा. मी आता एवढंच गाइड करेन की आता फक्त घरातलं पाणी गेलंय. थोड्या वेळाने सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळणार आहे".