Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी ५ सुरू होईन आता एक आठवडा झाला आहे. यंदाच्या पर्वात एकामागोमाग एक सरप्रायजेस चाहत्यांना मिळत आहे. विनोदवीर पंढरीनाथ कांबळेनेही यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. बाहेर अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना हसवणारा पॅडी बिग बॉसच्या घरात मात्र अगदी शांत दिसत आहे. भाऊच्या धक्क्यावरही रितेश देशमुखने पॅडीची कानउघाडणी करत त्याला त्याचा खरा खेळ दाखवायचा सल्ला दिला आहे.
आता विशाखा सुभेदारने पॅडीला पाठिंबा दिला आहे. पंढरीनाथ कांबळेसाठी विशाखाने खास पोस्ट केली आहे. "Happy friendship day मित्रा...तू तिथे त्याच्यासारखा नसलास तरीही तू खूप खरा आहेस. वेगळा आहेस, सज्जन आहेस, तारेवरची कसरत तुला कायमच जमलीय. तिथेही तू मैत्री कर आणि ती निभव...तुझ्यातली plus पॉईंट्स दाखवून दे.. गप बसू नकोस.. यारों का यार हैं तू..तुझ्या माणसासाठी तू उभा असतोस मदतीला,आज स्वतः साठी उभा रहा.. मित्रा. More power to you Paddy Kamble", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार हे सदस्य नॉमिनेट झाले होते. आता यांच्यापैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार हे आज कळेल.
'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण