Join us  

"तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि..."; भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला झापलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 5:54 PM

Bigg Boss Marathi 5 : रितेश भाऊ दर आठवड्याला सदस्यांची हजेरी घेताना दिसून येतो. या आठवड्यातही तो सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसून येणार आहे.

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi Season 5)च्या नव्या सीझनमधील सर्वच सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. 'बिग बॉस मराठी'चा हा गेम डोक्याने खेळण्याचा आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) भाऊ दर आठवड्याला सदस्यांची हजेरी घेताना दिसून येतो. या आठवड्यातही तो सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसून येणार आहे. या आठवड्यात जान्हवी(Janhvi Killekar)ला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील जान्हवीला तिची जागा दाखवली आहे. तसेच निक्की(Nikki Tamboli)ला देखील रितेशने चांगलेच सुनावले आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घराची चौथ्या आठवड्याची निक्की कॅप्टन झाली आहे. खरंतर हे कॅप्टनसीपद निक्कीकडे अरबाजमुळे आले. पण कॅप्टन पद मिळाल्यानंतर निक्कीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. निक्कीने कॅप्टनसीचा चुकीचा वापर केला. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेशने कॅप्टन निक्कीची चांगलीच शाळा घेतली आहे.

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख निक्कीला खडेबोल लगावले. रितेश भाऊ म्हणतोय,"मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका. निक्की तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धीदेखील हलकीच आहे. तुम्हाला या घरातले चालवत आहेत.  चावी मारतात आणि तुम्ही चावीतले माकड असतात ना...".

रितेशने जान्हवीला दाखवली तिची जागारितेश भाऊ जान्हवीला म्हणाला,"तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे. या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे. हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते. लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो". 

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुख