Join us  

हाच का 'कोकण हार्टेड बॉय'? अंकिताच्या जुन्या फोटोवर नेटकरी करतायेत कमेंट, खरंच ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 1:04 PM

अखेर चाहत्यांनी अंकिताचा होणारा नवरा कोण, याचा शोध घेतलाय.

 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची चौथी रनर अप होण्याचा बहुमान अंकिता वालावलकर म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या 'कोकण हार्टेड गर्ल'ला मिळाला. घराबाहेर आल्यावर तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अंकिता सध्या एका वैयक्तिक गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिचं लग्न.  आता ग्रँड फिनालेनंतर अंकिताला सर्वत्र तिच्या लग्नाबद्दल विचारलं जात आहे. तिचे काही चाहते सोशल मीडियावर मेसेज करून देखील तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल विचारपूस करत आहे. 

अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं.  होणारा नवरा संगीत दिग्दर्शक असल्याचं देखील तिने घरात सांगितलं होतं. पण, तिने त्याच्या नावाचा खुलासा केला नव्हता. अखेर चाहत्यांनी तो मुलगा नेमका कोण आहे, याचा शोध घेतलाय. अंकिताची एक जुन्ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अंकितासोबत कुणाल भगत आहे. कुणाल भगत हाच अंकिताचा होणारा नवरा असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. 

सोशल मीडियावरील अंकिताच्या जुन्या फोटोंवर नेटकरी कमेंट करत आहेत. 'हाच का 'कोकण हार्टेड बॉय'?' 'हाच सिक्रेट boyfrnd आहे कळलं', अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप अंकिताने अधिकृतपणे काही माहिती दिली नाही. नेटकऱ्यांचा हा अंदाज खरो ठरतो की नाही येत्या १२ ऑक्टोंबरला समोर येईल. कारण, १२ ऑक्टोंबरला अंकिता 'कोकण हार्डेट बॉय' कोण आहे, याचा खुलासा करणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटी