Join us

Bigg boss marathi: 'विकासच्या रक्तातच ते आहे'; दादूसने व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:03 IST

Bigg boss marathi: स्पर्धकांमध्ये एकमेकांविषयी कायम चर्चा करत असतात. परंतु, या सगळ्यापासून दादूस लांब राहत होते. मात्र, आता देखील या चर्चांमध्ये सहभागी होऊ लागले आहेत.

बिग बॉस मराठीच्या (Bigg boss marathi) घरात प्रत्येक आठवड्याला एक नवीन कार्य पार पडत असतं. या नव्या आठवड्यातदेखील असंच एक नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.  विशेष म्हणजे प्रत्येक टास्कमध्ये घरातल्या सदस्यांमधील मतभेद, वादविवाद पाहायला मिळतात. सोबतच स्पर्धकांमध्ये एकमेकांविषयी गॉसिप्सदेखील रंगतात. परंतु, या सगळ्या गॉसिप्स मधून दादूस हे बऱ्याचदा लांब राहण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, यावेळी चक्क दादूसने गॉसिप्समध्ये सहभाग घेतला असून त्यांनी विकासविषयी चर्चा केली आहे.

आज बिग बॉसच्या घरात 'डब्बा गुल' हे नवीन साप्ताहिक कार्य रंगणार आहे. यामध्ये दोन टीम करण्यात येणार असून दोन्ही टीम मेंबर्स त्यांची रणनिती आखताना दिसणार आहेत. यामध्येच विरुद्ध टीमला कसं हरवता येईल याचा प्लॅन जय आणि उत्कर्ष त्यांच्या टीमसोबत करत आहेत. यामध्येच दादूस विकासला नावं ठेवताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 2 Nov: टास्क खेळताना मीनल-मीरामध्ये मारामारी;  स्पर्धकांचा होणार डब्बा गुल

"ज्यावेळी मी बॉक्स आणेन त्यावेळी ते प्रोटेक्ट करायला एक माणूस हवा. दादूस रस्सी बांधायचं काम करतील. सोबत गायत्री आहेच. पण मला १०० टक्के खात्री आहे विरुद्ध टीममधून विकास बॉक्स पाडायला येईल. त्याच्याकडे जास्त बॉक्स असले तरीदेखील तो येणार",असं जय म्हणतो. त्यावर दादूस त्यांचं मत मांडतात."विकासच्या रक्तातच ते आहे. तो काही ना काही करायला येतोच", असं दादूस म्हणतात. त्यावर "शंभर टक्के रिबिन कापायला येतील", असं उत्कर्ष म्हणाला.

दरम्यान, या टीममध्ये झालेला हा संवाद विकासला समजणार का? जर त्याला समजलं तर दादूसोबत तो वाद घालणार का? हे पाहणं सध्या औत्सुक्याचं ठरत आहे. मात्र, या साऱ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात मिळणार आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार