Join us  

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची 'अबीर गुलाल' मालिकेत एन्ट्री, गायत्री दातारबरोबर दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 2:10 PM

कलर्स मराठीवरही 'अबीर गुलाल' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार आणि  पायल जाधव मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

गेल्या काही दिवसांत टेलिव्हिजनवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. कलर्स मराठीवरही 'अबीर गुलाल' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार आणि  पायल जाधव मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्याची झलक दिसत आहे. 

कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरुन 'अबीर गुलाल' मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या चेहऱ्यावरुन आधीच पडदा हटवण्यात आला होता. परंतु, या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव मात्र गुलदस्त्यात होतं. त्यामुळे 'अबीर गुलाल' मालिकेत नेमका कोणता अभिनेता दिसणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता मालिकेच्या प्रोमोमधून याचा उलगडा झाला आहे. 

'अबीर गुलाल' मालिकेत 'बिग बॉस मराठी' फेम अक्षय केळकर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत तो पहिल्यांदाच गायत्री दातारबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये त्याचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. अक्षयला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

'अबीर गुलाल' मालिकेची गोष्ट कोल्हापूरमध्ये घडताना दिसते. RJ शुभ्राच्या आवाजाच्या प्रेमात पडलेला गोष्टीचा नायक तिला भेटायला रेडिओमध्ये जातो. पण तिथे त्याची भेट होते श्री हिच्याशी. शुभ्रा आणि श्रीच्या आयुष्यातील गुंतलेल्या नशिबांचा गुंफलेला खेळ 'अबीर गुलाल' मालिकेत पाहायला मिळणार आहे. २७ मेपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेताबिग बॉस मराठीकलर्स मराठी