Join us

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 08:36 IST

बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल राजेशिर्केनेदेखील दिवाळीनंतर मुहुर्त गाठला आहे. निखिल लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. 

सध्या सिनेविश्वात लगीनघाई सुरू आहे. काही सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. तर काही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल राजेशिर्केनेदेखील दिवाळीनंतर मुहुर्त गाठला आहे. निखिल लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. 

निखिल राजेशिर्केने रविवारी(१७ नोव्हेंबर) कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाला सेलिब्रिटींनीही उपस्थिती दर्शविली होती. अभिनेत्री अभिज्ञा भावेने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निखिलने एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याचा मुहुर्त गाठत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता लग्नाच्या बेडीत अडकत त्याने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

दरम्यान, निखिलने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. टीव्हीवरील तो लोकप्रिय चेहरा आहे. 'छोटी मालकीण', 'रंग माझा वेगळा', 'असेही एकदा व्हावे', 'अजूनही बरसात आहे', 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्याने 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभाग घेतला होता. निखिलने अनेक सिनेमांतही काम केलं आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारमराठी अभिनेतासेलिब्रेटी वेडिंग